इंटरनेट किंवा संगणाकाची कार्यक्षमता कमी झाल्यास ब्राउजरमधील कॅशे, कुकीज आणि हिस्ट्री डिलीट करण्याचा सल्ला दिला जातो. असे का सांगितले जाते? ते डिलिट केल्याने काय होते? हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनाला शिवला असेल. ब्राउजरमध्ये केलेले सर्च, डाऊनलोड, हिस्ट्री, पासवर्ड इत्यादी माहिती ही तुमच्या ब्राउजरमध्ये जमा असते. हा डेटा कालांतराने संगणकामध्ये जमा होत राहातो, त्यामुळे संगणकाची गती कमी होते. म्हणून ब्राउजरमधील कुकी, कॅशे आणि हिस्ट्री नियमित डिलीट केली पाहिजे. याने संगणकात जागा राहाते, वैयक्तिक माहिती सुरक्षित राहाते आणि संगणकाची कार्यक्षमता वाढते.

काय आहे कुकीज?

तुम्ही कोणत्या संकेतस्थळावर गेल्यास आधी कुकीजबाबत परवानगी मागितली जाते. तेव्हा कुकीज काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, तर कुकीज तुम्ही बघत असलेले संकतेस्थळ तयार करणाऱ्या फाइल्स असतात. जेव्हा तुम्ही ब्राउजरवर काही शोधता किंवा संकेतस्थळावर परत येता तेव्हा या फाइल्स तुमचा मागोवा घेतात. चांगले ब्राउजिंग अनुभव देण्यासाठी असे केले जाते.

(५७ हजारांत घरी आणा नवीन IPHONE 14, जाणून घ्या ही जबरदस्त ऑफर)

कॅशे आणि हिस्ट्री काय आहे?

जेव्हा तुम्ही संकेतस्थळाला भेट देता तेव्हा कॅशे त्याचा काही भाग जसे छायाचित्रे स्मरणात ठेवते. दुसऱ्या भेटीत तुमचे आवडते पेज लवकर उघडावे यासाठी कॅशे असे करते. तर तुम्ही भेट दिलेल्या संकेतस्थळांची यादी तुमच्या हिस्ट्रीमध्ये असते. कॅशे आणि हिस्ट्री डिलीट करून वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवता येऊ शकतो.

हिस्ट्री, कॅशे, कुकीज कसे डिलीट करायचे?

१) गुगल क्रोम

गुगल क्रोम ब्राउजर उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यात तुम्हाला तीन डॉट बटन दिसून येतील. या बटनवर क्लिक करा. मोर टुल्सवर क्लिक करून त्यातील क्लिअर ब्राउझिंग डेटाला क्लिक करा. त्यानंतर ब्राउझिंग हिस्ट्री, डाऊनलोड हिस्ट्री, कुकीज, संकेतस्थळांचा डेटा आणि कॅशे सिलेक्ट करा. त्यानंतर क्लियर डेटावर क्लिक करा.

(ब्ल्यू टीकसाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा, ‘या’ करणामुळे मस्क यांनी थांबवले लाँच, म्हणाले जो पर्यंत…)

२) आयओएस सफारी

सफारी ब्राउजरमध्ये मेन्यूमध्ये जाऊन हिस्ट्री आणि त्यानंतर क्लियर हिस्ट्री निवडा. ज्या कालावधीतील डेटा तुम्हाला डिलीट करायचा आहे तो कालावधी निवडा आणि क्लियर हिस्ट्रीवर क्लिक करा. तुमची ब्राउझिंग हिस्ट्री आणि कॅशे डिलीट होईल.

३) मोजिला फायरफॉक्स

ब्राउजरमध्ये उजव्या कोपऱ्यात हॅमबर्गर मेन्यूवर क्लिक करा. नंतर डाव्या पॅनलमधून गोपनीयता आणि सुरक्षा पर्याय निवडा. त्यानंतर खाली कुकीज आणि साइट डेटापर्यंत स्क्रॉल करा. त्यानंतर क्लियर डेटावर क्लिक करा.

Story img Loader