तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आजच्या डिजिटल युगात हॅकर्स मालवेअर आणि व्हायरसच्या माध्यमातून डेटा चोरतात. खासगी माहिती चोरून तुमचे बँक खाते रिकामे देखील करू शकतात. सुरक्षेच्या दृष्टीने गुगल प्ले स्टोअरवर असे व्हायरस पाठवणाऱ्या आणि डेटा चोरणाऱ्या पवर बंदी आहे. आता गुगलने जोकर नावाच्या मालवेअर पाठवणाऱ्या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र हे अ‍ॅप हटवण्यापूर्वी गुगल प्ले स्टोअरवरून ५ लाख वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे.

जोकर मालवेअरबाबत पहिल्यांदा २०१७ मध्ये माहिती मिळाली होती. या माध्यमातून हॅकर्सनी अँड्रॉइड वापणाऱ्यांवर हल्ला केला होता. २०१९ मध्ये गुगलने याबाबत सर्वांना अलर्ट दिला होता. यानंतर गुगलवरून हा व्हायरस काढून टाकला होता. मात्र एका वर्षापासून एका अ‍ॅपच्या माध्ममातून मालवेअर व्हायरस कार्यरत होता. १६ डिसेंबरला याबाबत माहिती मिळताच बंद करण्यात आला आहे. सुरक्षा फर्म जोकर मालवेअर फ्लीसवेअर म्हणून क्लासिफाइड करण्यात आला आहे. युजर्संना सशुल्क प्रीमियम सेवांचे सदस्यत्व घेण्यास प्रवृत्त करणारे क्लिक आणि एसएमएस कॅप्चर केले जात होते. गुगल प्ले स्टोअरने हे अ‍ॅप स्टोअरमधून काढून टाकले आहे. मात्र हे अ‍ॅप आधी डाउनलोड केलेल्या युजर्ससाठी अजूनही चिंतेचा विषय आहे.

Whatsapp च्या मदतीने बँक खात्यात पाठवू शकता पैसे; जाणून घ्या साध्या स्टेप्स

जोकर इन्फेक्‍टेड कलर मेसेजेस अ‍ॅप डाउनलोड करणार्‍या ५०,००० लोकांपैकी तुम्ही एक असाल तर ते तुमच्या डिव्‍हाइसवरून तात्काळ हटवा. फोनवरून हे अ‍ॅप अनइंस्टॉल करण्यासोबतच तुम्ही गुगल प्ले स्टोअरच्या गेम्स आणि अ‍ॅप्स विभागात जाऊन त्याची फाईल हटवू शकता. तुम्हाला Google Play Store उघडावे लागेल आणि मेनूमधील सबस्क्रिप्शन पर्यायावर जावे लागेल. तुम्ही साइन अप केलेल्या सर्व प्रीमियम सबस्क्रिप्शन तपासा, आणि त्यापैकी काही संशयास्पद वाटत असल्यास, ते निवडा आणि नंतर सदस्यता रद्द करा. नंतर तुम्हाला स्क्रीनवरील सूचनांचे पालन करावे लागेल. यामुळे भविष्यात होणारी फसवणूक टाळू शकता.

Story img Loader