मेटाने अधिकृतपणे Threads अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप ट्विटरला टक्कर देणार आहे. एलॉन मस्क यांच्या ट्विटरला टक्कर देण्यासाठी हे अॅप लॉन्च करण्यात आले आहे. हे App वापरकर्त्यांना फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर फॉलो करत असलेल्या अकाउंट्सना परवानगी देईल. याशिवाय वापरकर्त्यांना इन्स्टाग्रामवरील युजरनेम ठेवण्याची देखील परवानगी देईल. Play Store किंवा अॅप स्टोअरवरून थ्रेडस हे App डाउनलोड केल्यावर वापरणे अगदी सोपे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Threads अॅप हे नवीन असले तरी इन्स्टाग्रामच्या ब्रॅंडिंग आणि संरचना याच्या अंतर्गत येते. ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यात सहजपणे लॉग इन करता येते आणि कोणत्याही अडचणींशिवाय आपलया मित्रांना शोधू शकतात. थ्रेडस इन्स्टाग्रामचे टेक्स्ट आधारित संभाषण App आहे. हे App लोकांना एकत्रित येण्याची आणि त्यांना आजच्या महत्वाच्या प्रत्येक गोष्टीवर आणि उद्या काय ट्रेडिंग असेल याबद्दल चर्चा करण्याची परवानगी देते. मेटाने Threads ला ट्विटरला पर्याय म्हणून लॉन्च केले आहे.
१. इन्स्टाग्रामवरील वेरिफाइड अकाउंट असलेले वापरकर्ते थ्रेड्सवर ब्लू टीकचा फायदा घेऊ शकतात. मात्र वापरकर्त्यांना ट्विटर ब्लू टिकसाठी ८ डॉलर प्रति महिना मोजावे लागतात.
२. थ्रेड्सवर व्हेरीफाईड आणि व्हेरीफाईड नसलेले असे दोन्ही वापरकर्ते पाच मिनिटांपर्यत व्हिडीओ पोस्ट करू शकणार आहेत. तर दुसरीकडे ट्विटर ज्यांच्याकडे ब्लू टिक नाही त्या वापरकर्त्यांना २० सेकंदांपर्यंत व्हिडीओ पोस्ट करण्याची परवानगी देते.
३. थ्रेड्स वापरकर्त्यांना ५०० शब्दांची मर्यादा दिली जाणार असलयाचे मेटाने स्पष्ट केले. तर ट्विटरवर वापरकर्त्यांना हीच मर्यादा २८० शब्द इतकी आहे.
४. थ्रेड्स वरील कंटेंटचे नियम, अकाउंट म्यूट आणि ब्लॉक करण्याचे नियंत्रण हे सर्व इन्स्टाग्रामप्रमाणेच असणार आहेत.
५. काही दिवसांपूर्वी ट्विटरने व्हेरीफाईड नसलेल्या अकाउंटसाठी वाचता येणाऱ्या पोस्टची संख्या ६०० तर ब्लू टिक असलेल्या वापरकर्त्यांसाठी ही संख्या ६ हजार पर्यंत मर्यादित केली. सध्या थ्रेड्सवर अशीच कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही.
६. थ्रेड्स अॅप कोणत्याही जाहिरातीशिवाय लॉन्च करण्यात आले आहे. ब्लूममर्गच्या अहवालानुसार शक्य तितक्या मोठ्या वापरकर्त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी हे केले गेले आहे.
७. थ्रेड्स अॅप हे थेट इन्स्टाग्रामशी जोडलेले असल्याने कोणाला फॉलो करायचा हा प्रश्न इथे निर्माण होत नाही. तसेच तुम्ही ज्यांना इस्टाग्रामवर ब्लॉक केले आहे ते अकाउंट यामध्येही तसेच राहणार आहेत.
८. कोणीही वापरकर्ता थ्रेड्सवर प्रायव्हेट मेसेज पाठवू शकत नाही. तसे करायचे असल्यास तुम्हाला इन्स्टाग्रामवर जावे लागेल. तथापि ट्विटरवर मेसेज प्राप्त होणे आणि पाठवण्यास वापरकर्ते सक्षम असतील.
९. तुम्ही होमपेजवर स्क्रोल करून थ्रेड्सवर काय आहे हे शोधू शकता. दुसरीकडे ट्विटर चे होमपेज वापरकर्त्यांना ट्रेडिंग बातम्यांसह अन्य विषय पाहण्याची परवानगी देते.
१०. स्क्रीनशॉट्सनुसार, थ्रेड्स सुरु करण्यासाठी वापरकर्त्यांना तीन वेळा एंटर प्रेस करावे लागते. तर ट्विटरवर प्लस बटणावर क्लिक करून सुरू केले जाऊ शकते. हे वृत्त timesofindia ने दिले आहे.