तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स आपल्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून शकता. तसेच लायसन्सच्या मदतीने त्याची सॉफ्ट कॉपीदेखील डाउनलोड करून फोनध्ये ठेवू शकता. सरकारने पर्याय दिला आहे जेणेकरून नागरिक आपल्या ड्रायव्हिंग लायसन्स आपल्या फोनमध्ये ठेवू शकतात किंवा त्याची सॉफ्ट कॉपी डीजीलॉकर ( DigiLocker )किंवा एमपरिवहन mParivahan अॅपद्वारे डाऊनलोड करू शकतात. ही सुविधा विशेषत: अशा वेळी उपयुक्त ठरते जेव्हा तुम्ही तुमच्यासह ओरिजनल ड्रायविंग लायसन्स ठेवणे विसरता. याशिवाय ड्रायविंग लायसन्ससाठी आपला स्मार्टफोनमध्ये सेव्ह करू शकता आणि आपल्याला प्रत्येकवेळी हार्ड कॉपीसोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स हरविण्याचे चिंतादेखील दूर होते.
सन २०१८मध्ये भारत सरकारने राज्यासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर केली होती, ज्यानुसार डीजीलॉकर किंवा एमपरिवहन अॅपमध्ये ठेवलेले ड्रायव्हिंग लायसन्स आणि व्हेइकल रजिस्ट्रेशन स्वीकारले जाईल. ड्रायव्हिंग करताना कागदपत्र सोबत बाळगण्याची गरज संपवितो. gadgets360ने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स आपल्या स्मार्टफोनमध्ये कसे ठेवू शकता किंवा त्याची सॉफ्ट कॉफी कशी डाऊनलोड करू शकता हे जाणून घ्या.
हेही वाचा – एअरटेलच्या ‘या’ पॅकमध्ये मिळवा १५ ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिपशन आणि फ्री डेटादेखील
सर्व प्रथम हे जाणून घ्या की लायसन्स फोनमध्ये ठेवण्यासाठी तुमच्याकडे डीजीलॉकर अकाऊंट असणे आवश्यक आहे. तुम्हाला डिजीलॉकरमध्ये फोन नंबर किंवा आधार नंबरचा वापर करून साइन-अप करावे लागेल.
- प्रथम DigiLocker साइटवर जा आणि तुमचे युजरनेम आणि सहा अंकी पिनसह साइन इन करा. यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत नंबरवर वन-टाइम पासवर्ड (OTP) प्राप्त होईल.
- साइन इन केल्यानंतर, गेट इश्यूड डॉक्युमेंट्स बटणावर क्लिक करा.
- आता सर्च बारमध्ये “ड्रायव्हिंग लायसन्स” शोधा.
- यानंतर, तुम्हाला ज्या राज्य सरकारकडून ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले आहे ते निवडा.
- आता तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका आणि गेट डॉक्युमेंट बटणावर क्लिक करा. पुढे जाण्यापूर्वी चेक बॉक्सवर क्लिक करण्याचे सुनिश्चित करा ज्यामध्ये तुम्हाला तुमचा डेटा DigLocker सोबत शेअर करण्यासाठी तुमची संमती द्यावी लागेल.
- आता DigiLocker तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स परिवहन विभागाकडून मिळवेल.
- जारी केलेल्या कागदपत्रांच्या सूचीवर जाऊन तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स पाहू शकता.
- ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी पीडीएफ बटणावर क्लिक करून डाउनलोड करता येईल.
- डिजीलॉकर अॅप डाउनलोड करूनही तुम्ही तुमच्या फोनमध्ये परवाना ठेवू शकता.
हेही वाचा – WFH साठी मनमानी चालणार नाही, महिन्यातून १२ दिवस ऑफिसला या अन्यथा…; TCS ने कर्मचाऱ्यांना पाठवलेला मेमो चर्चेत
जर तुम्हाला DigiLocker वर साइन-अप करायचे नसेल आणि तुम्ही पर्याय शोधत असाल तर तुम्ही mParivahan Google Play किंवा Apple च्या App Store द्वारे देखील डाउनलोड करू शकता. साइन-अप केल्यानंतर तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स DL डॅशबोर्ड टॅब अंतर्गत शोधू शकता.