Reliance Digital launches Digital India Sale : आज १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन आहे. सकाळी शाळा, ऑफिस, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणे येथे राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे. तर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रम, पूजा, रॅली यांचे आयोजन करण्यात आले होते. तर या सगळ्यात रिलायन्स डिजिटल या कंपनीने आपला ‘डिजिटल इंडिया सेल’ (Digital India Sale ) सुरू केला आहे. या सेलमध्ये तुम्ही गॅझेट्स, घरगुती जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करू शकणार आहात. हा सेल आजपासून सुरू झाला असून, तुम्ही १८ ऑगस्ट २०२४ पर्यंत याचा लाभ घेऊ शकणार आहात. रिलायन्स डिजिटल आणि माय जिओ स्टोअरच्या या सेलमध्ये प्रत्येक ग्राहकासाठी काहीतरी खास असणार आहे.
डिजिटल इंडिया सेल (Digital India Sale ) सेलमध्ये EMI पर्याय, विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्सवर २५ टक्के सवलत, घरातील मनोरंजन करणारी साधने म्हणजेच टीव्ही, स्पीकर, स्वयंपाकघरातील काही महत्त्वाच्या वस्तू तुमच्यासाठी उपलब्ध असतील. काही स्टॅण्डआउट डीलमध्ये ५५ इंचांचा यूएचडी टीव्ही फक्त २९ हजार ९९० रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. आयफोन १३ (iPhone 13)ची किंमत ४७ हजार ६०० रुपये असणार आहे; तर नवीन आयफोन १५ (iPhone 15) फक्त ६३ हजार ६०० रुपयांमध्ये तुम्हाला मिळू शकणार आहे.
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन :
ज्यांना काम किंवा अभ्यास करण्यासाठी लॅपटॉपची गरज आहे. त्यांच्यासाठी Digital India Sale मध्ये Intel Core i5 लॅपटॉपची किंमत अगदी परवडणाऱ्या किमतीत म्हणजेच ३९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध असणार आहे. फक्त ४८ हजार ९९० रुपयांना रेफ्रिजरेटर आणि १९ हजार ९९० रुपयांना टॉप लोड वॉशिंग मशीन उपलब्ध आहे. तसेच, एअर कंडिशनरवर तुम्ही सहा हजार रुपयांपर्यंतच्या सवलतीचा आनंद घेऊ शकता, असे रिलायन्स डिजिटलने एका प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, टाटा समूहाच्या मालकीच्या क्रोमानेसुद्धा ९ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत आपला ‘स्वतंत्रता दिन विक्री’ सेलदेखील सुरू केला आहे. या सेलमध्ये ग्राहक आकर्षक सवलती, झटपट कॅशबॅक मिळवू शकतात आणि croma.com वर स्टोअरमध्ये किंवा ऑनलाइन अशा दोन्ही पर्यायांचा आनंद घेऊन खरेदी करू शकतात. तर तुम्हीसुद्धा तुमच्या सोईनुसार या सेलमध्ये खरेदी करा आणि स्वस्तात मस्त वस्तू खरेदी करून घरी आणा.