सध्याच्या काळात मोबाइल, लॅपटॉप, टॅब, संगणक हा दैनंदिन जीवनाचा जणू एक भाग झाला आहे. विद्यार्थ्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी ही साधने उपयुक्त आहेत. पण, या साधनांचा अतिवापर झाल्यास याचे गंभीर परिणामही अनेकांना भोगावे लागतात. तर या साधनांचा खासकरून विद्यार्थ्यांकडून योग्य तो वापर व्हावा म्हणून एका तंत्रज्ञान कंपनीने एक खास गोष्ट केली आहे. बाटू तंत्रज्ञान कंपनीने विद्यार्थ्यांसाठी एक सुरक्षित टॅब लाँच केला आहे.

बाटू टेक (Baatu Tech ) हे एक डिजिटल पॅरेंटिंग प्लॅटफॉर्म आहे. ‘बाटू टेक’ ही कंपनी नेहमीच पालक नियंत्रण प्रणाली (डिजिटल पॅरेण्टिंग) मध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यात अग्रगण्य असते. तर आता या प्लॅटफॉर्मने ॲण्ड्रॉईड १२ ऑपरेटिंग सिस्‍टम असलेला एक टॅब लाँच केला आहे, ज्याचे नाव आहे ‘एनेबल टॅब.’ भारतातील व्‍हर्च्‍युअल क्षेत्रात विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. नुकतेच लाँच करण्‍यात आलेला ‘एनेबल टॅब’ बाटू टेक कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट यांसारख्‍या लोकप्रिय ई-कॉमर्स व्‍यासपीठांवर १५,९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्‍ध आहे. तसेच बाटू टेक लाँच कालावधीदरम्यान प्लॅटफॉर्म त्यांच्या ग्राहकांना ५०० रुपयांची विशेष सूटसुद्धा देणार आहे.

Parents who give nylon manja to their children are also facing action by nashik police
मुलांना नायलॉन मांजा देणारे पालकही कारवाईच्या फेऱ्यात
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Pune will soon be known as an electronic cluster says Ashwini Vaishnav
पुण्याची ओळख लवकरच ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’, काय म्हणाले अश्विनी वैष्णव?
Special Makar Sankranti Ukhane in Marathi
Makar Sankranti Ukhane : महिलांनो, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात घ्या एकापेक्षा एक हटके उखाणे, एकदा लिस्ट पाहाच
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…
nylon manja loksatta news,
पुणे : नायलॉन मांजा विक्री करणारी महिला ताब्यात, संक्रातीत पतंगबाजीसाठी छुप्या पद्धतीने मांजा विक्रीचा प्रकार उघड
two arrested with banned drugs at kalyan bail bazaar
कल्याणमध्ये बैलबाजारात प्रतिबंधित औषधांसह दोन जण अटकेत

डिजिटल पालकत्व क्षमता वाढवण्यासाठी ‘एनेबल टॅब’ आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (AI) मदत घेते. हे टॅबलेट मुख्य म्हणजे अयोग्‍य कन्‍टेट ओळखण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. डिव्हाईजमध्ये अयोग्य कन्टेन्ट ओळखण्‍याची व त्‍याबाबत पालकांना अलर्ट करण्‍याची एआय मॉडेल्‍सची क्षमता आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि विश्वासू ऑनलाइन वातावरण मिळेल. टॅब पालक नियंत्रण प्रणालीने म्हणजेच (पॅरेण्‍टल कंट्रोल सिस्‍टमने) परिपूर्ण आहे. ‘बाटू पॅरेण्टिंग ॲप’ एनेबल टॅबवर एक लिंक प्रदान करते; यामध्ये विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन कृतींबाबत सविस्‍तर माहिती देण्यात येते. तसेच खास गोष्ट अशी की, एनेबल टॅब पॅरेण्टिंग ॲपशी कनेक्‍ट केल्‍याशिवाय विद्यार्थी कोणतेही कार्य करू शकत नाहीत आणि ऑनलाइन तुम्ही जितका वेळ घालवत आहात त्या प्रत्येक मिनिटावर देखरेख आणि कन्‍टेन्‍ट विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित असण्‍याची खात्री या ॲपद्वारे मिळते.

हेही वाचा…‘या’ कंपनीने लाँच केले सिम कार्डयुक्त पहिले स्मार्टवॉच! काय असणार खास?

बाटू टेक कंपनीचे संस्‍थापक व व्‍यवस्‍थापकीय संचालक संदीप कुमार म्‍हणालेत की, “हायपर-कनेक्‍टिव्‍हिटीच्‍या युगात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात फोनचा वापर करत असल्‍यामुळे, आम्‍ही येत्या पिढीवर याचा होणारा परिणाम होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवून हा पुढाकार घेतला आहे. डिजिटल साक्षरतेची गरज असली तरीही या सगळ्या गोष्टींमुळे कोणतेही नुकसान होणार नाही याची आपण खात्री घेतली पाहिजे. तर एनेबल टॅब यांचे समतोल राखू शकतो. तसेच कंपनी एण्‍ड-टू-एण्‍ड एन्क्रिप्‍शन वापरून मुलांची सुरक्षा आणि गोपनियता आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्याची खात्री देते.

तसेच या टॅबमधील प्रमुख वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:

१. जिओ फेन्सिंग (Geo Fencing) : विशिष्‍ट क्षेत्रांमध्‍ये प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना वापरकर्त्‍यांना सूचित करण्‍यासाठी व्‍हर्च्‍युअल पॅरामिटर तयार करते.

२. स्क्रीन टाइम मॉनिटरिंग: पालक दररोज स्क्रीन टाइम लिमिट्स सेट करू शकतात आणि सविस्‍तर आकडेवारीच्‍या माध्‍यमातून डिवाईस व ॲपमधील योग्य माहिती मिळवू शकतात.

३. ॲप कंट्रोल/मॉनिटरिंग : तसेच मुलांचे पालक विशिष्‍ट ॲप्‍लिकेशन्‍स लॉक किंवा अनलॉक करू शकतात.

४. अयोग्‍य कन्‍टेन्‍ट ओळखणे: एआय मॉडेल्‍सचा वापर करत अयोग्‍य कन्‍टेन्‍ट स्कॅन केले जातील.

५. बॅटरी लेव्‍हल मॉनिटरिंग : मुलांकडून बॅटरीचा अधिक वापर झाल्‍यास त्‍यावर देखरेख केली जाईल आणि त्‍याबाबत पालकांना वेळोवेळी सूचित करण्यात येईल.

पालकांसाठी या ॲपवर आकडेवारी, टेक्‍स्‍ट मॉनिटरिंग व कॉल व्‍हाइटलिस्टिंगचीसुद्धा सुविधा उपलबद्ध असणार आहे. तसेच एनेबल टॅब पॉवरहाऊस टॅब्‍लेट आहे, जो कोणत्‍याही गोष्‍टीची पडताळणी करू शकतो. हा टॅबलेट विद्यार्थ्यांबरोबर व्‍यावसायिक व कुटुंबातील इतर सदस्यांसाठीसुद्धा उपयुक्त आहे. या टॅब्‍लेटमध्‍ये १०.१ इंच एचडी डिस्‍प्‍ले आहे. तसेच या बरोबरच शक्तिशाली मीडियाटेक प्रोसेसर, ड्युअल कॅमेरा, उच्‍च क्षमतेचे स्‍पीकर्स आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारी ६००० एमएएच बॅटरीसुद्धा आहे

तसेच, बाटू टेक कंपनीला ऑनलाइन सुरक्षिततेसह मानसिक आरोग्‍यासंदर्भातील महत्त्वपूर्ण समस्‍यांचे निराकरण कसे करायचे याचीसुद्धा माहिती आहे. त्यांनी ‘एनेबल टॅब’मध्‍ये आत्महत्या (सुसाइड) अलर्ट फिचर ठेवला आहे, जे एआय अल्‍गो‍रिदम्‍सचा वापर करत मुलांच्‍या ऑनलाइन कृतींमधील तणावाच्‍या संभाव्‍य चिन्‍हांना ओळखण्यास मदत करतात. हे एक उत्तम फिचर आहे; जिथे पालकांना विद्यार्थ्यांच्या अशा भावनिक वेळेत साह्य करण्‍यासाठी अलर्टस् व संसाधने प्रदान केली जातात. म्हणून बाटू तंत्रज्ञान कंपनीचा हा ‘एनेबल टॅब’ शाळकरी मुलांसाठी एक उत्तम पर्याय ठरेल.

Story img Loader