iPhones : भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात Apple कंपनीच्या आयफोन (iPhone) मोबाईलची खूप क्रेझ आहे. आधी फक्त श्रीमंतांच्या हातात आयफोन दिसायचा. मात्र, आता सर्वसामान्यांच्या हातात देखील हा फोन पाहायला मिळतो. खरं तर आयफोन घेण्याचं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. त्यामुळे फोन युजर्समध्ये आयफोनची किती क्रेझ आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. दरम्यान, आता सर्व कंपन्या एआयवर (AI) लक्ष केंद्रित करत असल्याचं पाहायला मिळत आहे. गुगल आणि मायक्रोसॉफ्टनंतर आता ॲपलनेही यावर लक्ष केंद्रित केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयफोन १६e लाँच झाल्याबरोबरच चॅटजीपीटी (ChatGPT) चीही एन्टी अॅपलच्या डिवाइसमध्ये झाली. आता तुम्हाला चॅटजीपीटी सपोर्ट असलेल्या अनेक डिवाइसची माहिती मिळाली असेलच. मात्र, आता अॅपलकडून जेमिनीलाही (Gemini) आयफोनमध्ये एंट्री दिली जाऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. अॅपल आपल्या आयफोन आणि आयपॅडमध्ये गुगल जेमिनी (Google Gemini) वापरू शकते. सध्या अॅपल ओपन एआयचे AI मॉडेल वापरत आहे. पण iOS १८.४ बीटा कोड सूचित करतो की कंपनी गुगलच्या जेमिनीला देखील त्यांच्या AI सिस्टम Apple Intelligence मध्ये जोडू शकते.

आयओएस (iOS) १८.४ बीटा सह बॅकएंड अपडेटमध्ये “OpenAI” आणि “Google” दोन्ही पर्याय आता Apple Intelligence मध्ये थर्ड-पार्टी मॉडेल म्हणून जोडले जाऊ शकतात. या फीचरवर काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप अॅपलकडून याबाबत अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, iOS १८.४ चे नवीन अपडेट एप्रिलमध्ये आणले जाऊ शकते. पण एआयचा वापर विनामूल्य असेल की त्यासाठी स्वतंत्र सबस्क्रिप्शन खरेदी करावी लागेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संदर्भातील वृत्त gsmarena ने दिलं आहे.

अॅपलचे वरिष्ठ उपाध्यक्ष क्रेग फेडेरिघी (Craig Federighi) यांनी यापूर्वी सुचवलं होतं की कंपनी इतर एआय मॉडेल्ससह एकत्रीकरण देऊ इच्छित आहे यामध्ये गुगलच्या नावाचाही समावेश होता. दरम्यान, अॅपलने अधिकृतपणे स्पष्ट केलं की एप्रिलमध्ये Apple Intelligence iOS १८.४ आणि iPadOS १८.४ सह ईयू (EU) मध्ये उपलब्ध असेल. या अपडेटसह AI आणखी भाषांमध्ये आणण्यासाठी विचार केला जाऊ शकतो, म्हणजेच आता Apple आपल्या OS मध्ये प्रादेशिक भाषा प्रणाली देखील समाविष्ट करणार आहे. आयफोन १७ सीरीज या वर्षी लॉन्च होऊ शकते. त्यामुळे कंपनी आपल्या सॉफ्टवेअरवर वेगाने काम करत आहे. अहवालात दावा करण्यात आला आहे की कंपनीचे संपूर्ण लक्ष एआयवर असेल.