इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप आपले अ‍ॅप सुधारण्यासाठी सतत नवीन फीचर्सवर काम करत असते. सध्या हे अ‍ॅप अनेक नवीन फीचर्स आणण्याची तयारी करत आहे. यापैकी काही अ‍ॅपमध्ये आधीच अपडेट केले गेले आहेत आणि काही फीचर्स येत्या काळात रिलीज केले जातील. अ‍ॅप अलीकडेच एका नवीन फीचरवर काम करत असल्याचे दिसले आहे. तरीही काही युजर्सना याबद्दल जाणून आश्चर्य वाटू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन फीचर युजर्सना डीसअपिअर मेसेज सेव्ह करण्यास अनुमती देईल. विशेषत: युजर्सच्या मेसेजची प्रायव्हसी वाढवण्यासाठी आणि त्यांना अधिक सुरक्षित करण्यासाठी कंपनीने हे फीचर जारी केले होते.

पण, कंपनी आता या फीचरला नवा ट्विस्ट देत आहे, ज्यामुळे यूजर्सच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. अशा प्रकारे डीसअपिअर झालेले मेसेज फोनमध्ये सेव्ह होत नाहीत. त्यामुळे त्यांना डीसअपिअर्ड मेसेज असे नाव देण्यात आले आहे. माहितीनुसार, या फीचरला “कीप मेसेज “असे नाव देऊ शकते. ज्यावर अ‍ॅप काम करताना दिसत आहे.

आता अ‍ॅप न उघडताच होणार पेमेंट; जाणून घ्या Google Pay चे नवे फीचर

व्हॉट्सअ‍ॅप ट्रॅकिंग साइट Wabetainfo ने याबाबत माहिती शेअर केली आहे. साइटने हे फीचर स्पष्ट करणारा एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. त्यानुसार, मेसेजिंग अ‍ॅप यूजर्सना डीसअपिअर झालेले मेसेज फोनमध्ये सेव्ह करण्याची सुविधा देईल. रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, जेव्हा यूजर्स डीसअपिअर झालेल्या चॅटमध्ये खूप आवश्यक असलेला मेसेज देतात आणि त्यांना तो गमावायचा नसतो, तेव्हा ते त्या मेसेजच्या एक्सपायरी डेटपूर्वी सेव्ह करू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, अ‍ॅपच्या आगामी अपडेटमध्ये तुम्ही डीसअपिअर झालेले काही मेसेज डीसअपिअर होण्यापासून रोखू शकता.

व्हॉट्सअ‍ॅप फीचर ट्रॅकरने शेअर केलेला स्क्रीनशॉट दर्शवितो की व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्ट इन्फो आणि ग्रुप इन्फोमध्ये एक नवीन विभाग सादर करण्याची योजना करत आहे, जे सर्व सेव्ह मेसेजची यादी करेल. यूजर्स जेव्हा हा मोड चालू करतील तेव्हाच ते मेसेज सेव्ह करू शकतील. नाहीतर, डीसअपिअर झालेले मेसेज देखील त्यांच्या निर्धारीत मोडनुसार ७ दिवस किंवा २४ तासांनंतर डीसअपिअर होतील. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की चॅटमधील प्रत्येकजण ते मेसेज अन-सेव्ह करु शकतात, त्यामुळे अ‍ॅप आता ते मेसेज सर्च करण्याचा सोपा मार्ग शोधण्याचा विचार करत आहे.

Facebook वर आपल्या मित्रांपासूनही लपवता येणार आपली पोस्ट; नवे फीचर पाहून युजर्स झाले खुश

याशिवाय अ‍ॅपच्या इतर फीचर्सबद्दल बोलताना कंपनीने अलीकडेच काही नवीन फीचर्स अधिकृत केले आहेत. अलीकडेच, अ‍ॅपमध्ये २ जीबी आकाराच्या फाइल्स शेअर करण्याची सुविधा जारी करण्यात आली आहे. या सर्व फाइल्स एंड टू एंड एनक्रिप्टेड असतील. यापूर्वी अँपमध्ये फक्त १०० एमबी फाइल्स ट्रान्सफर करण्याची सुविधा होती. मात्र, एवढी मोठी फाइल शेअर करण्यासाठी युजर्सना वायफायशी कनेक्ट करणे आवश्यक आहे.

Story img Loader