फोन बरोबरच दैनंदिन जीवनात उपयोगात येणारी इतर साधणे जसे, स्मार्टवॉच, पावर बँक हे देखील महाग झाले आहेत. पण तुम्हाला या वस्तू कमी किंमतीत घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. अमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू असून यात ही उपकरणे १ हजार रुपयांच्या आत मिळत आहेत.
१) रेडमी पॉवर बँक
Redmi Power Bank कॉम्पॅक्ट डिजाईनस येतो, त्यामुळे याला कुठेही घेऊन जाणे शक्य आहे. या पॉवर बँकमध्ये १० हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या उपकरणात २ यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत, जे १० वॉट पर्यंत फास्ट चार्जिंग करतात. दोन्ही पोर्टपैकी एक पोर्ट मायक्रो यूएसबी तर दुसरा सी टाईप सपोर्ट करतो. सूट नंतर हा पॉवर बँक ९४९ रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. हा मोबाइल चार्जिंगसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्याला कुठेही नेता येत असल्याने प्रवसात जर मोबाइलची बॅटरी संपली तर या पॉवर बँकचा वापर करून मोबाइल चार्ज करता येऊ शकतो.
(काय आहे हॅशटॅग? इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवण्यासाठी ‘असा’ करा वापर)
२) पोर्ट्रोनिक्स रायटिंग पॅड
Portronics Writing Pad मध्ये १२ इंचचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो रेडिएशन फ्री आहे. वजनाने हल्का असलेला हा पॅड मुले देखील वापरू शकतात. या पॅडवर तुम्ही महत्वाचे रिमाइंडर्स आणि नोट्स लिहू शकता. सूट नंतर हा पॅड ४५९ रुपयांमध्ये विकल्या जात आहे.
३) बोट एअरडोप्स १२१ व्ही २ व्हायरलेस इअरबड
चार्जिंग केससह boAt Airdopes 121v2 True Wireless Earbuds १४ तासांचा प्लेबॅक देतात. प्रत्येक चार्जवर बड्स ३.५ तासांचा प्लेबॅक देतात. बडमध्ये चांगल्या आवाजासाठी ८एमएमचे ड्राइव्हर्स देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी ब्ल्युटूथ व्हर्जन ५ सपोर्ट मिळतो. ६७ टक्क्यांच्या सूटनंतर हे बड्स ९९९ रुपयांमध्ये मिळत आहेत.
(सायबर भामट्यांचा सुळसुळाट, 4G सिम 5G जी करण्याच्या नावाखाली ‘असा’ होत आहे लुटीचा प्रयत्न)
४) झेब्रॉनिक्स स्मार्टवॉच
Zebronics SmartWatch (ZEB-FIT280CH) ला आयपी ६८ रेटिंग मिळालेली आहे. ही घड्याळ स्प्लॅश रेझिस्टेंट आहे. या घडाळीत तुम्हाला कॉल रिजेक्ट आणि १२ स्पोर्ट मोड मिळतील. तसेच हार्ट रेट, ब्लड ऑक्सिजन आणि रक्तदाब तपासण्याचे फीचर देखील मिळतात. ७५ टक्क्यांच्या सूटनंतर ही घड्याळ ९९९ रुपयांना मिळत आहे.