Mobile Recharge: मोबाईल डेटा सध्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, सध्या भारतासह जगभरातील लोकांचा इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान जर तुमचा वापर जास्त असेल आणि तुम्ही जास्त डेटा ऑफर करणारे प्लॅन शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ज्यामध्ये तुम्हाला दररोज दोन जीबी डेटा मिळणार आहे. जाणून घ्या कोणती आहे ही कंपनी जी तुम्हाला हा भन्नाट प्लॅनसह बरेच फायदे देणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एअरटेल देणार भरपूर डेटा

एअरटेल ही देशातील सर्वात आघाडीच्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. ही कंपनी सतत ग्राहकांच्या बजेटमध्ये असणारे आणि जीओ-वोडाफोन-बीएसएनएलला टक्कर देण्यासाठी भन्नाट प्लॅन लाँच करत असते. असाच एक एअरटेलचा प्लॅन आहे या प्लॅनमध्ये एक वर्षाची वैधता आणि दररोज दोन जीबी डेटा त्याचबरोबर मोफत ओटीटीची सुविधा मिळते. यामध्ये मेसेजिंगसाठी दररोज १०० एसएमएसची सुविधाही उपलब्ध आहे.

(आणखी वाचा : आता YouTubeच्या ‘या’ भन्नाट फीचरवरुन महिन्याला कमवा लाखो रुपये; आताच जाणून घ्या कसा होईल तुमचा फायदा?)

एअरटेलच्या २,९९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार बरेच फायदे

एअरटेलच्या २,९९९ रुपयांच्या एअरटेल प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच, कंपनी ग्राहकांना एकूण ७३० जीबी डेटा ऑफर करते. या प्लॅनची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल्सची सुविधाही देण्यात आली आहे. म्हणजेच, कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता, तुम्हाला देशभरात अनलिमिटेड व्हॉइस कॉल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा लाभ मिळतो.

तसेच, या प्लॅनमध्ये ग्राहक डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन एक वर्षासाठी मोफत मिळवू शकतात. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सस्ट्रीम मोबाईल सबस्क्रिप्शनही एका वर्षासाठी उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला विंक म्युझिक अॅपवर मोफत गाणी ऐकण्याची सुविधा आणि मोफत हॅलो ट्यून्सचा लाभ मिळतो. यासोबतच या प्लॅनमध्ये Fastag वर १००रुपयांचा कॅशबॅक देखील उपलब्ध आहे.