Disney+ Hotstar हे देशातील सर्वात लोकप्रिय OTT ॲप्सपैकी एक आहे. डिस्ने + हॉटस्टार प्रीमियम सुविधा रिलायन्स जिओच्या ब्रॉडबँड सुविधा Jio Fiber च्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनमध्ये देखील उपलब्ध आहे. याशिवाय, एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरचे काही प्लॅन देखील आहेत जे डिस्ने + हॉटस्टार फ्री सब्सक्रिप्शन देतात. जर तुम्हाला हॉटस्टारवर क्रिकेट मॅचेस, एक्सक्लुझिव्ह वेब सिरीज आणि टीव्ही शो यासारखे कंटेंट बघायला आवडत असेल, तर तुम्हाला अशा अनेक ब्रॉडबँड प्लॅन्स मिळतील ज्यामध्ये हॉटस्टार सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. चांगली गोष्ट म्हणजे हॉटस्टार मेंबरशिपसाठी यूजरला वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत.

Jio Fiber and Airtel Xstream Disney Plus Hotstar Subscription Plans
Jio Fiber प्रीपेड आणि पोस्टपेड व्यतिरिक्त, Airtel Xstream Fiber प्लॅनबद्दल जाणून घेऊया जे Disney + Hotstar फ्री सबस्क्रिप्शनसह येतात.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Fair Play Betting App Case, ED , ED seizes assets ,
फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरण : ईडीकडून आतापर्यंत ३४४ कोटींच्या मालमत्तेवर टाच
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
youth of Nashik came to Aheri and raped minor girl after friendship through online gaming called Free Fire
गडचिरोली : धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
Pune will soon be known as an electronic cluster says Ashwini Vaishnav
पुण्याची ओळख लवकरच ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’, काय म्हणाले अश्विनी वैष्णव?
Tata Motors January Offer
Tata Motors January Discount : ग्राहकांसाठी खुशखबर! टाटा पंच ईव्ही अन् टाटा टियागो ईव्ही वर ८५ हजारांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या सविस्तर

Jio Fiber Prepaid Broadband Plans with Disney Plus Hotstar Premium subscription

Jio Fiber Rs 999 plan
Jio Fiber च्या ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अनमिलिटेड इंटरनेट उपलब्ध आहे. डेटा डाउनलोड आणि अपलोड स्पीड १५० Mbps पर्यंत आहे. Jio Fiber च्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 14 OTT ॲप्सचा ॲक्सेस देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये, Disney + Hotstar Premium, Amazon Prime, Sony Liv, Zee5, Alt Balaji सारख्या OTT सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहेत.

Jio Fiber Rs 1499 plan
Jio Fiber चा १,४९९ रूपयांचा ब्रॉडबँड प्लॅन ३०० Mbps च्या डाउनलोड आणि अपलोड स्पीडसह अनमिलिटेड इंटरनेट ऑफर करतो. याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. या फायबर प्लॅनमध्ये १५ OTT ॲप्समध्ये प्रवेश कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दिला जातो. या प्लॅनमध्ये Disney + Hotstar, Netflix, Amazon Prime, Sony Liv, Jio Cinema, Zee5 सारख्या स्ट्रीमिंग ॲप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

BSNL च्या या प्लॅनमध्ये 4TB (४००० GB) पर्यंत ३०० Mbps स्पीड उपलब्ध आहे. ही मर्यादा संपल्यानंतर स्पीड ४ Mbps इतका कमी होतो. या प्लॅन अंतर्गत ग्राहक देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनमिलिटेड कॉल करू शकतात. डिस्ने + हॉटस्टारची मोफत प्रीमियम मेंबरशिप प्लॅनमध्ये उपलब्ध आहे.

Jio Fiber Postpaid Broadband Plans with Disney Plus Hotstar Premium subscription

Jio Fiber Rs 599 plan

Jio च्या ५९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनची ​​वैधता एक बिल सायकल (२८ दिवस) आहे. यामध्ये बेस प्लॅनसाठी ३९९ रुपये आणि १४ OTT ॲप्ससाठी २०० रुपये आकारले जातात.

Jio Fiber चा हा पोस्टपेड प्लान ३० Mbps डाउनलोड आणि अपलोड स्पीड ऑफर करतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनमिलिटेड डेटा दिला जातो. प्लॅनमध्ये अनमिलिटेड व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये ५५० हून अधिक टीव्ही चॅनेल देण्यात आले आहेत. जिओच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये एकूण १५ ॲप्स मोफत दिले जातात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना Disney + Hotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळते.

Jio Fiber Rs 899 plan
८९९ रुपयांच्या JioFiber पोस्टपेड प्लॅनची ​​वैधता एक बिल सायकल आहे. ग्राहकांकडून बेस प्लॅनसाठी ६९९ रुपये आणि प्लॅनमधील १४ OTT ॲप्सच्या सबस्क्रिप्शनसाठी २०० रुपये आकारले जातात.

८९९ रुपयांचा JioFiber प्लॅन १०० Mbps डाउनलोड आणि अपलोड स्पीड ऑफर करतो. यामध्ये अनलिमिटेड डेटाची सुविधा देण्यात आली आहे. JioFiber चा हा पोस्टपेड प्लॅन ५५० हून अधिक टीव्ही चॅनेलच्या सुविधेसह येतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स देखील देण्यात आले आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डिस्ने + हॉटस्टार प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत मिळते.

Airtel Xstream Fiber broadband plans with Disney Plus Hotstar Super subscription

Airtel Xstream Fiber Rs 999 plan

एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरचा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन २०० Mbps पर्यंतच्या स्पीडसह इंटरनेट ऑफर करतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स देण्यात आले आहेत. हा प्लॅन अनलिमिटेड डेटासह येतो. हा ब्रॉडबँड प्लॅन डिस्ने+ हॉटस्टार, ॲमेझॉन प्राइम मेंबरशिप, एक्स्ट्रीम प्रीमियम सर्व्हिस, विंक म्युझिक प्रीमियम सबस्क्रिप्शन आणि कस्टमर केअरवर व्हीआयपी ट्रिटमेंट ऑफर करतो.

Airtel Xstream Fiber Rs 1,498 plan
Airtel च्या १,४९८ च्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ३०० Mbps च्या स्पीडने अनमिलिटेड डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल आणि डेटा देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये अनेक OTT सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहेत. Airtel Xstream च्या या प्लॅनमध्ये Disney + Hotstar, Airtel Xstream, Wink Music, Netflix Basic आणि Amazon Prime चे सबस्क्रिप्शन मोफत आहे.

Airtel Xstream Fiber Rs 3,999 plan
एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरच्या ३,९९९ रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, हा एक VIP एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर ब्रॉडबँड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये १ Gbps पर्यंत इंटरनेट स्पीडसह डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि व्हॉइस कॉलची सुविधा देते. या प्लॅनमध्ये Disney + Hotstar, Airtel Xstream, Wink Music, Netflix Premium आणि Amazon Prime चे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

Story img Loader