डिस्नी + हॉटस्टार हे भारतातील एक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. वॉल्ट डिस्ने (DIS.N) ची भारतातील स्ट्रीमिंग सेवा आपल्या वापरकर्त्यांना फक्त चार डिव्हाइसवरून लॉग इन करण्याची परवानगी देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्याची योजना आखत आहे. याचा उद्देश प्रमुख बाजारपेठेत पासवर्ड शेअरिंग मर्यादित करणे हा आहे. याची माहिती असलेल्या दोन व्यक्तींनी हे सांगितले. नुकतेच नेटफ्लिक्सने देखील भारतात पासवर्ड शेअरिंग बंद केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डिस्नीचा हा प्लॅन अशा वेळी आला आहे जेव्हा मे महिन्यात स्ट्रीमिंग प्रतिस्पर्धी नेटफ्लिक्सने १०० पेक्षा अधिक देशांमधील मेंबर्सना त्यांच्या घराबाहेरील लोकांसह अकाउंट शेअर करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील असे सांगण्यास सुरुवात केली आहे. भारतात डिस्नी + हॉटस्टार स्ट्रीमिंग सेवेचे प्रीमियम अकाउंट अजूनही १० डिव्हाइसवर लॉग इन करण्याची परवानगी देते. जरी तिची वेबसाईट सध्या म्हणते की “लॉग इन करता येणार्या डिव्हाइसेसची संख्या” चार आहे. नवीन निर्बंधांसह काही लोकांना आपली स्वतःची सदस्यता खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.” असे त्या व्यक्तीने सांगितले. याबाबतचे वृत्त reuters ने दिले आहे.
डिस्नीने यावर टिपण्णी करण्यास नकार दिला आहे. डिस्नेला अशा होती की चार डिव्हाइस लॉग इन धोरणाची काटेकोरपणे अंमलबाजवणी न केल्याने मेंबर्स आकर्षित होतील जे पासवर्ड शेअरिंगच्या माध्यमातून सेवेत प्रवेश करू शकतात. त्यानंतर त्यांची स्वतःचे अकाउंट खरेदी करतात असे त्या व्यक्तीने सांगितले.
डिस्नी, नेटफ्लिक्स , Amazon (AMZN.O) आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या मालकीचे जिओसिनेमा भारतात प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. जे २०२७ पर्यंत या क्षेत्रामध्ये ७ बिलियन डॉलर्स पर्यंत वाढेल असा मीडिया पार्टनर एशियाचा अंदाज आहे. इंडस्ट्री डेटा सांगतो की हॉटस्टार अंदाजे ५० दशलक्ष वापरकत्यांसह मार्केटमध्ये अग्रस्थानी आहे. दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीने सांगितले की, भारतात डिस्नी + हॉटस्टारने चार डिव्हाइस लॉग इन करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी केली नाही कारण ती प्रीमियम वापरकर्त्यांची गैरसोय करू इच्छित नव्हती. मात्र कंपनीला अंतर्गतरित्या आढळले आहे की केवळ ५% प्रीमियम सदस्यांनी चार पेक्षा जास्त डिव्हाइसेसवरून लॉग इन केले आहे.
दुसऱ्या व्यक्तीने सांगितले की, नवीन नियोजित प्रतिबंध त्यांच्या स्वस्त किंमतीच्या प्लॅनवर देखील लागू होतील. जे दोन डिव्हाइसपुरते मर्यादित असेल. डिस्नेच्या हॉटस्टारने जानेवारी २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान भारताच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममध्ये ३८ टक्के प्रेक्षकसंख्येसह अव्वल स्थान पटकावले. तर नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडीओचे प्रतिस्पर्धी प्रत्येकी ५ टक्के होते असे रिसर्च फार्म मीडिया पार्टनर्स एशियाच्या डेटाने दर्शविले आहे.