युट्यूब हे सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. आपला आवडता कंटेंट युट्यूबवर सहजरित्या उपलब्ध होतो. त्यामुळे युजर्ससाठी हे सर्वात आवडते प्लॅटफॉर्म आहे. इतर व्हिडीओ प्लॅटफॉर्म्सप्रमाणे हा प्लॅटफॉर्मवर देखील प्रिमियम कंटेंन्ट उपलब्ध आहे. दर महिन्याला १२९ रुपयांमध्ये ही प्रिमियम सर्विस मिळवता येते. पण आता १२९ रुपयांमध्ये नाही तर फक्त १० रूपयांमध्ये प्रिमियम व्हिडीओ पाहता येणार आहेत. दिवाळीनिमित्त युट्यूबकडुन ‘युट्यूब प्रिमिअम’साठी एक ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरनुसार फक्त १० रुपयांमध्ये ३ महिन्यांसाठी युट्यूब सब्सक्रीप्शन मिळवता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१० रूपयांमध्ये असे मिळवा प्रिमियम सब्सक्रीप्शन
युट्यूब सुरू करून त्यात उजव्या बाजूला वर असणाऱ्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा. त्यामध्ये ‘गेट युट्यूब प्रिमियम’ (Get Youtube Premium) या पर्यायावर क्लिक करा, यामध्ये तुम्हाला दिवाळीनिमित्त देण्यात आलेली खास ऑफर दिसेल.

या ऑफरमध्ये युजर्सना ३ महिन्यांपर्यंत ॲड फ्री व्हिडीओ पाहता येणार आहेत. तसेच काही व्हिडीओंना ऑफलाईन सेव्ह करता येत नाही, या प्रिमियम फीचरमध्ये ते व्हिडीओ डाउनलोड करता येतील. यासह नवीन लाँच होणारे युट्यूब व्हिडीओदेखील सहज पाहता येतील.