Instagram Followers Increase Trick : इन्स्टाग्राम (Instagram) हे सध्याच्या घडीचे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ज्याचा आज जगभरातील अनेक जण वापर करत आहेत. मित्र-मैत्रिणींसह गप्पा मारण्यापासून ते रोजच्या वेगवेगळ्या रिल्स बघण्यापर्यंत शिवाय तयार करण्यापर्यंत सर्व सुविधा इन्स्टाग्रामवर उपलब्ध आहेत. यामुळेच लोक आता याचा वापर केवळ फोटो शेअर करण्यासाठीच करत नाहीत तर येथे रिल्स बनवून प्रसिद्ध होण्यासाठी करत आहेत. याशिवाय लोक यातून मोठ्या प्रमाणात कमाईदेखील करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण, इन्स्टाग्रामवर रिच वाढवण्यासाठी तुमच्या अकाउंटवर तुमचे चांगले फॉलोअर्स असणे महत्त्वाचे आहे. बहुतेक लोकांना असे वाटते की, प्रायव्हेट अकाउंटवर फॉलोअर्स वाढवणे कठीण आहे, परंतु तसे अजिबात नाही. आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही काही दिवसांतच तुमच्या प्रायव्हेट इन्स्टाग्राम अकाउंटवर फॉलोअर्सची संख्या दुपटीने वाढवू शकता. कसे ते जाणून घ्या.

इन्स्टाग्रामच्या प्रायव्हेट अकाउंटवर फॉलोअर्स कसे वाढवायचे?

१) आकर्षक प्रोफाइल तयार करा

इन्स्टाग्राम अकाउंटचा रिच वाढवण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही तुमचा प्रोफाईल फोटो, बायो आणि बायो लिंक अपडेट करणे महत्त्वाचे आहे. तुमचा प्रोफाईल फोटो असा निवडा, जो क्लिअर आणि हाय क्वॉलिटीचा असेल. तुमच्या बायोमध्ये तुमच्याबद्दल काही मनोरंजक माहिती लिहा. याशिवाय युजरनेम लांबलचक ठेवू नका. तुमचे प्रोफाईल ऑथेंटिक दिसण्यासाठी तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामला लिंक करा.

२) नियमितपणे फोटो, व्हिडीओ करा पोस्ट

इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या अकाउंटवर नियमित कंटेन्ट पोस्ट करणे आवश्यक आहे. केवळ सुट्टीच्या दिवशी भरपूर व्हिडीओ किंवा फोटो शेअर करून आणि अनेक दिवस विश्रांती घेऊन असे करू नका. असे केल्याने युजर्स एंगेजमेंट तुमच्या अकाउंटमधून काढून टाकली जाऊ शकते, त्यामुळे तुम्ही दररोज एका निश्चित वेळी कंटेन्ट पोस्ट करणे खूप महत्वाचे आहे.

३) कंटेन्ट क्लॉलिटी सुधारा

इंट्रेस्टिंग आणि आकर्षक असे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करा. त्याचबरोबर कॅप्शन एकदम हटके द्या. तुम्ही कॅप्शनमध्ये तुमचा फोटो किंवा व्हिडीओ रिलेटेड प्रश्न विचारू शकता किंवा कोणत्याही लहान इंट्रेस्टिंग गोष्टी शेअर करू शकता. यामुळे तुमच्या पुढील पोस्टबद्दल लोकांची उत्सुकता वाढेल आणि युजर्स तुमची रील इतरांबरोबर शेअर करू शकतात, ज्यामुळे तुमच्या फॉलोअर्सची संख्या वाढू शकते.

४) हॅशटॅगकडे दुर्लक्ष करू नका

इन्स्टाग्राम कंटेन्ट अपलोड करताना, पोस्टशी संबंधित आणि ट्रेंडनुसार हॅशटॅगचा समावेश करा. यामुळे तुमची पोस्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते. तुम्ही तुमचे स्वतःचे काही खास हॅशटॅगदेखील तयार करू शकता. हे तुमच्या ब्रँड किंवा व्यक्तिमत्त्वाचा प्रचार करण्यात मदत करू शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diy instagram followers increase trick hoe to gain followers in instagram private account sjr
Show comments