दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी मोबाईलच्या उपयोगामुळे अगदीच सोप्या झाल्या आहेत. पण, या स्मार्टफोनचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेसुद्धा आहेत. स्मार्टफोनमध्ये असणाऱ्या सोशल मीडिया ॲपवर येणारे संदेश अनेकदा वापरकर्त्यांची फसवणूक करण्यासाठी असतात. तर आज एका कंपनीने या घोटाळ्यासंबंधित (ग्लोबल स्कॅम) अभ्यास करून एक यादी तयार केली आहे आणि वापरकर्त्यांसाठी कोणते संदेश धोकादायक आहेत हे सांगितले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सिक्युरिटी कंपनी एमसीअफीने मॅकॅफी (McAfee) अलीकडेच ग्लोबल स्कॅम संदेश यांच्यावर अभ्यास केला आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्या आणि सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांसाठी एक यादी जारी करण्यात आली आहे. त्यातील सात धोकादायक मेसेजची यादी काढण्यात आली आहे; ज्यात डिव्हाइज हॅक करण्यासाठी किंवा पैसे चोरण्यासाठी एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवले जातात. तसेच या अहवालात दावा करण्यात आला आहे की, ८२ टक्के भारतीय अशा मेसेजवर क्लीक करतात आणि स्कॅमचे बळी पडतात.
तर कंपनीने यादीत जाहीर केलेले ‘सात’ धोकादायक संदेश कोणते ते पाहूयात :
१. तुम्ही बक्षीस जिंकले आहात (You’ve won a prize) :
व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) किंवा एसएमएसवर (SMS) अभिनंदन! तुम्ही एवढी रोख रक्कम जिंकला आहात, असा संदेश तुम्हाला अनेकदा येत असेल. अशा संदेशात तुमचे मोबाईलमधील पैसे चोरण्याची ९९ टक्के शक्यता जास्त असते. स्मार्टफोन वापरकर्त्यांची ओळखपत्रे किंवा पैसे चोरण्यासाठी असे संदेश पाठवले जातात.
२. खोट्या नोकरीसंबंधित सूचना आणि ऑफर (Fake job notifications or offers) :
नोकरीच्या ऑफर कधीही व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसवर येत नाहीत. अशा प्लॅटफॉर्मवर कोणतीही व्यावसायिक कंपनी कधीही तुमच्याही संपर्क साधणार नाही; त्यामुळे तुम्हाला नोकरीसंबंधित व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसवर संदेश पाठवला जात असेल तर तो एक निश्चित घोटाळा आहे, असे समजावे.
३. युआरएलबरोबर (URL) येणारा बँकेचा संदेश (Bank alert messages with URL ):
आपल्याला अनेकदा एसएमएसवर युआरएल लिंकद्वारे केवायसी (KYC) भरण्यास सांगणारे संदेश येत असतात. तसेच व्हॉट्सअॅपवरसुद्धा बँकसंबंधित संदेश पाठवले जातात. तर स्मार्टफोनवर युआरएल लिंक आणि बँकेचा व्हॉट्सअॅपवर येणारा मेसेज तुमचे पैसे चोरण्याच्या उद्देशाने येत असतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.
४. तुम्ही खरेदी न केलेल्या वस्तूंची माहिती (Information about a purchase that you haven’t made):
तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी केली नसेल आणि जरी त्याचे अपडेट एसएमएसद्वारे तुमच्यापर्यंत येत असतील, तर एक घोटाळा आहे. असे संदेश वापरकर्त्यांना मॅसेजवर क्लिक करून त्यांचे फोन हॅक करण्यासाठी करण्यात येतो.
५. नेटफ्लिक्स किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन (Netflix OTT subscription updates ) :
ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट, मालिका, वेब सीरिज पाहिल्या जातात. दिवसेंदिवस ओटीटीची लोकप्रियता वाढत असताना, फसवणूक करणारे स्कॅमर स्मार्टफोन वापरकर्त्यांना नेटफ्लिक्स किंवा इतर ओटीटी सबस्क्रिप्शनच्या एसएमएसद्वारे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. यात विनामूल्य ऑफर किंवा तात्काळ सबस्क्रिप्शन करा, अशा एसएमएसचा समावेश असतो.
६. बनावट डिलिव्हरी समस्यांच्या सूचना (Fake missed delivery, or delivery problem, notification) :
तुम्ही अनेकदा एखादी वस्तू ऑर्डर करता आणि त्याचे पैसेसुद्धा ऑनलाईन पाठवून देता. पण, कधी कधी तुमची वस्तू तुमच्यापर्यंत पोहचत नाही किंवा पैसे पाठवल्यावर ती वस्तू तुम्हाला द्यायला नकार देतात. तर अशा अनेक डिलिव्हरी समस्यांबद्दल एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या सूचना धोकादायक असू शकतात.
७.ॲमेझॉन किंवा खात्यांसंबंधित सूचनांचे संदेश (Amazon security alert or notification messages regarding account update) :
ॲमेझॉनसंबंधित सुरक्षा सूचना तसेच तुमच्या खात्यांसंबंधित कोणतेही अपडेट एसएमएसवरून तुम्हाला पाठवण्यात येत असतील तर वेळीच सावध रहा. कारण, ॲमेझॉन किंवा कोणतीही ई-कॉमर्स कंपनी महत्वाच्या सूचनांसाठी तुमच्यापर्यंत एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपद्वारे कधीही पोहचणार नाहीत.तसेच जर असे संदेश तुम्हाला पाठवले जात असतील तर हा नक्कीच एक घोटाळा आहे.