जगात हॅकिंगचे प्रकार वाढले आहेत. ईमेलमधील महत्वाची माहिती चोरी करून आर्थिक फसवणूक किंवा माहितीचा गैरफायदा घेण्याचा प्रकार हॅकिंगद्वारे होतो. त्यामुळे, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी स्वत: सतर्क राहणे गरजेचे आहे. तुम्हाला जर तुमच्या जीमेल किंवा इतर ईमेल अकाउंटवर अनोळखी क्रिया घडत असल्याचे दिसून आले, तर तुमचे ईमेल खाते इतर व्यक्ती वापरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ईमेल हॅक झाले, असे तुम्हाल वाटत असेल तर पुढील टीप्स फॉलो करा.

(‘GOOGLE’ आणि ‘APPLE’ च्या सीईओंनी दिवाळी निमित्त दिलेल्या शुभेच्छांची सर्वत्र चर्चा, ट्विट्सला नेटकऱ्यांची पसंती)

  • तुमच्या खात्याला कोणते डिव्हाईस जोडले गेले होते याबाबत माहिती घ्या. स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक अशा सर्व उपकरणांबाबत माहिती काढा.
  • पासवर्ड रिसेट करा आणि मजबूत पासवर्ड ठेवा.
  • ज्या कंपनीची ईमेल सेवा तुम्ही वापरत आहात त्या कंपनीशी संपर्क करून त्यांना माहिती द्या.
  • तुमचे ईमेल खाते हॅक झाले आहे असे तुमच्या संपर्कातील सर्वांना कळवा.
  • ईमेल खाते गमावल्यास तुम्हाला काही नुकसान नसेल, तर मग ते बंद करून नवे ईमेल खाते तयार करा.
  • तुमचे ईमेलखाते सुरक्षित करण्यासाठी दोन चरणी व्हेरिफिकेशन सुरू करा. याने हॅकर्सपासून तुमच्या खात्याला सुरक्षा मिळेल. दोन चरणी व्हेरिफिकेशनमध्ये तुमचे पासवर्ड असते आणि दुसरे सुरक्षा की किंवा प्रिंटेड कोड राहील. याने हॅकरला तुमचा पासवर्ड जरी कळला तरी कोड किंवा सुरक्षा की माहिती नसल्याने तो ईमेल खाते बळकावू शकणार नाही.
  • मालवेअरसाठी संगणक स्कॅन करा. दुसरे काही हॅक झाले का ते तपासा. उपकरणामध्ये व्हायरस स्कॅन करा. उपकरणामध्ये आपोआप नियमित स्कॅनिंग होणार अशी सोय करून ठेवा. याने उपकरण मालवेअर, व्हायरसपासून सुरक्षित राहील.
  • खाते उघडताना विचारण्यात आलेले सुरक्षेसंबंधी प्रश्न आणि त्याची उत्तरे लक्षात असू द्या, ते खाते परत मिळण्यात मदत करू शकतात.

Story img Loader