ट्रेनचा प्रवास हा सोपा आणि सोयीस्कर समजला जातो. ट्रेनमध्ये प्रवास करणारी अनेक माणसं आपल्याला जादा सामान घेऊन प्रवास केल्याची दृश्ये सर्रास पाहायला मिळतात. मात्र, तुम्हाला माहीत नसेल की, जसं विमानात प्रवासात घेऊन जाणाऱ्या सामानावर मर्यादा असते तशीच ट्रेनमध्येही घेऊन जाणाऱ्या सामनावर असते. यासाठी परवानगी दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन एखादा प्रवाशी प्रवास करत असेल, तर त्यासाठी प्रवाशांना दंड भरावा लागतो. ज्या प्रवाशांना त्यांच्या वर्गासाठी परवानगी दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन प्रवास करायचा असेल, तर ते ब्रेक व्हॅनमध्ये स्लॉट बुक करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्याच्या लगेज नियमांनुसार एसी फर्स्ट क्लासच्या तिकिटासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ७० किलोपर्यंत सामान नेण्याची परवानगी आहे, तर एसी द्वितीय श्रेणीसाठी ५० किलोपर्यंत सामान नेण्याची परवानगी आहे. तुम्ही जर एसी थ्री-टायर स्लीपर किंवा एसी चेअरकार कंपार्टमेंटमध्ये प्रवास करत असल्यास, तुम्ही ४० किलोपर्यंतचे सामान मोफत घेऊन जाऊ शकता. द्वितीय श्रेणीच्या स्लीपर कोचमध्ये, प्रति प्रवासी सामानाची परवानगी मर्यादा ३५ किलो आहे. प्रवाशांनी हे देखील सुनिश्चित करणे आवश्यक आहे की पिशव्या आणि पार्सलची लांबी, जाडी आणि रुंदी १०० सेमी X ६० सेमी X २५ सेमी पेक्षा जास्त नसावी. जर सामान निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर प्रवाशांना ते नेण्यासाठी ब्रेक व्हॅनमध्ये जागा बुक करावी लागेल.

( हे ही वाचा: आता IRCTC खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक! येथे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या)

जूनमध्ये रेल्वेने सामानाच्या नियमात बदल केल्याची अफवा पसरली होती. मात्र, रेल्वे मंत्रालयाने ट्विटद्वारे या वृत्तांचे खंडन केले आणि सांगितले की सामानाचे नियम बदलण्याची अशी कोणतीही योजना नाही. सध्याचे सामानाचे नियम १० वर्षांहून अधिक काळ लागू आहेत. त्यामुळे ही अफवा अफवाच राहिली. दरम्यान,भारतीय रेल्वेअलीकडेच IRCTC वेबसाइटवर एका आयडीने तिकीट बुक करण्याची मर्यादा वाढवली आहे. याआधी आधारशी लिंक नसलेल्या IRCTC ID वरून एका महिन्यात जास्तीत जास्त सहा तिकिटे बुक करता येत होती. आयडी आधारशी लिंक केल्याने एका महिन्यात आता १२ तिकिटे बुक करता येणार आहेत. तथापि, नवीन नियमांनुसार, आधारशी लिंक केलेल्या आणि लिंक नसलेल्या आयडीवरून अनुक्रमे २४ आणि १२ तिकिटे बुक करता येतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know the luggage rules of irctc learn details gps