ड्रोन ही भारतासाठी नवीन गोष्ट नसली तरी गेल्या दोन दिवसांपासून भारतात त्याची जोरदार चर्चा होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ ते २९ मे दरम्यान चालणाऱ्या ड्रोन फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी त्याचे महत्त्व सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकीकडे विरोधक त्यांची यावर ताशेरे ओढत आहेत, तर दुसरीकडे सर्वसामान्य लोक ड्रोनबद्दल बरेच काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपण ड्रोनच्या धोरणाशी संबंधित अधिक तपशील जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्न किंवा इतर प्रसंगी ड्रोनवरून करण्यात आलेले व्हिडीओ रेकॉर्डिंग तुम्ही पाहिले असेलच. किंवा ड्रोनने वस्तू पोहोचवल्याबद्दलही तुम्ही ऐकले असेल. याशिवाय पोलिसांकडून गस्तीसाठीही याचा वापर केला जातो, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने सर्वसामान्यांना त्याचा वापर करणे तितकेसे सोपे नाही. ड्रोनच्या वापरासंबंधी काही नियम आहेत, ते न पाळल्यामुळे पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असे. मात्र, काळाच्या ओघात आणि लोकांची मागणी लक्षात घेऊन सरकारने ड्रोनबाबतच्या धोरणात अनेक बदल केले आहेत.

Mail Delivery Using Drone : २५ मिनिटात ४६ किमीवर वैद्यकीय सामानाची डिलेव्हरी, तेही ड्रोनच्या सहाय्याने; देशातील पहिलाच प्रयत्न यशस्वी

सध्या भारतात फक्त ५ प्रकारचे ड्रोन उपलब्ध आहेत. यातील पहिले नॅनो ड्रोन आहे, ज्याची वजन क्षमता २५० ग्रॅमपेक्षा कमी आहे. दुसरा मायक्रो ड्रोन आहे, ज्याची वजन क्षमता २ किलोपेक्षा कमी आणि २५० ग्रॅमपेक्षा जास्त आहे. तिसरी श्रेणी स्मॉल ड्रोन आहे, ज्याची क्षमता २ किलो ते २५ किलो पर्यंत आहे. यानंतर चौथ्या क्रमांकाचा मध्यम ड्रोन येतो, ज्याची क्षमता २५ किलो ते १५० किलोपर्यंत असते. पाचव्या क्रमांकावर मोठा ड्रोन आहे, ज्याची वजन क्षमता १५० किलो ते त्यापेक्षा जास्त आहे.

https://digitalsky.dgca.gov.in/home या वेबसाइटला भेट देऊन तुम्हाला याशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल. या वेबसाइटवर तुम्हाला एरो स्पेस मॅप मिळेल. नकाशावर हिरवे, पिवळे आणि लाल झोन नमूद केले जातील. येथे तुम्ही ड्रोन कुठे उडवू शकता आणि कुठे उडवू शकत नाही याचीही माहिती मिळेल. कोणत्या झोनची परवानगी आवश्यक आहे आणि कोणत्यासाठी नाही, हेही सांगण्यात येथे सांगण्यात आले आहे. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ग्रीन झोनमध्ये ड्रोन उडवण्यासाठी अनेक परवानग्या लागणार नाहीत.

आता अ‍ॅप न उघडताच होणार पेमेंट; जाणून घ्या Google Pay चे नवे फीचर

याशिवाय ज्या लोकांना नॅनो ड्रोन उडवायचे आहेत त्यांना यूआयएनची गरज भासणार नाही. मायक्रो ड्रोन उडवण्यासाठी रिमोट पायलट लायसन्स देखील आवश्यक नाही, परंतु मायक्रो ड्रोनच्या वर असलेल्या प्रत्येक ड्रोनसाठी तुम्हाला परवाना आणि यूआयएन घ्यावा लागेल.

आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की हे यूआयएन काय आहे. वास्तविक, यूआयएनचे पूर्ण रूप म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. हा युनिक नंबर प्रत्येक ड्रोनला म्हणजेच मानवरहित विमान प्रणालीला दिला जातो. ज्याप्रमाणे परिवहन विभागाकडून नवीन वाहनांना क्रमांक दिला जातो, हे अगदी तसेच आहे. तुम्हाला युनिक नंबरसाठी काही शुल्क द्यावे लागेल. यासाठी तुम्ही डिजिटल स्काय वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करू शकता आणि १०० रुपये शुल्क भरून युनिक नंबर मिळवू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know the rules for flying a drone learn about the licensing process and fees pvp