तुम्ही स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच आणि स्मार्ट गॅजेट्सचा भरपूर वापर केला असेल, पण तुम्हाला कोणत्याही स्मार्ट शूबद्दल विचारले तर तुमचे उत्तर कदाचित नाही असेच असेल. मात्र, नुकतंच Nike ने आपले स्मार्ट शूज लाँच केले आहेत. हे नायकी शू स्मार्ट आणि पूर्णपणे स्वयंचलित आहे. नायकीचे हे शूज लेसला रोबोटप्रमाणे बांधतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे.

या नायकी शूचे नाव आहे Adapt BB. दिसण्याच्या बाबतीत, ते बास्केटबॉल शूसारखे आहे. या बुटाचे वैशिष्ट्य म्हणजे ते परिधान केल्यावर आपोआप लेसेस बांधले जातात. जर तुम्ही बास्केटबॉल खेळाडू असाल तर हे तुमच्यासाठी अगदी योग्य आहेत.

Facebook वरील ‘या’ मेसेजवर चुकूनही क्लिक करू नका; बँक खाते होऊ शकते रिकामी

Nike Adapt BB रक्तदाब सांगण्यास देखील सक्षम आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते परिधान करून तुम्ही चालत असाल आणि तुमचे पाय सुजले तर हा शू तुमच्या रक्तदाबानुसार आपोआप अ‍ॅडजस्ट होईल. हे शू गरजेनुसार घट्ट आणि सैल होतात.

तुम्ही अ‍ॅपच्या माध्यमातून या शूला पूर्णपणे नियंत्रित करू शकता. याआधी नायकीने Nike + iPod आणि Nike + Training सारखे स्मार्ट शूज सादर केले आहेत जे लोकांनाही आवडले आहेत. Nike Adapt BB भारतात लॉंच करण्याबाबत कंपनीने अद्याप काहीही सांगितले नाही.

Story img Loader