Bluetooth Earphone : ब्लूटूथ इअरफोन आपल्यापैकी अनेकजण वापरत असतील. मार्केटमध्ये नवनवीन प्रकारचे ब्लूटूथ इअरफोन आणि वायरलेस इअरफोन उपलब्ध आहेत. अगदी कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेकांकडे ब्लूटूथ इअरफोन दिसतात. या इअरफोनमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत, पण तुम्हाला या ब्लूटूथ इअरफोनमुळे शरीरावर होणारे गंभीर परिणाम माहिती आहे का? आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊया.

१. न्यूरोलॉजिकल आजार

‘Centers for Disease Control and Prevention’च्या एका रिपोर्टनुसार नॉन-आयोनाएजिंग रेडिएशनच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नियमित राहल्याने ब्रेन टिश्यू खराब होण्याची शक्यता असते, ज्यामुळे न्यूरोलॉजिकल आजारांचा धोका वाढतो.

२. ब्रेन कॅन्सर

इयरफोनमधून बाहेर पडत असलेले रेडिएशन ब्रेन टिश्यूसाठी धोकादायक असतात. याशिवाय ब्रेनमध्ये जर आधीच कोणताही ट्यूमर असेल तर हा रेडिएशन ट्यूमरला आणखी उत्तेजित करतो, ज्यामुळे ब्रेन कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

हेही वाचा : Jellyfish parenting : पालकांनो, मुलांना असे बनवा आत्मविश्वासू आणि जबाबदार, हा फॉर्म्युला १०० टक्के काम करणार, एकदा वाचाच…

३. कानाचा पडदा खराब होऊ शकतो

इअरफोनच्या अति वापरामुळे कानाच्या पडद्यावर परिणाम होतो. इअरफोनच्या अति आवाजामुळे वायब्रेशन
निर्माण होते, ज्यामुळे कानाचे पडदे खराब होऊ शकतात.

४. बहिरेपणा

इअरफोनचा वापर करून खूप जास्त आवाजात सातत्याने गाणे ऐकल्यामुळे बहिरेपणा येऊ शकतो. आपल्या कानाची ऐकण्याची क्षमता ९० डेसिबल आहे, जी हळू हळू ४०-५० डेसिबल होते आणि आपल्याला कमी ऐकू येते.

५. इन्फेक्शन

कधीही हेडफोन हे स्वत:चे वापरा. इतरांचे हेडफोन चुकूनही वापरू नका. यामुळे कानाचे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. जर एखाद्याचे हेडफोन वापरायचे असतील, तर आधी हेडफोन स्वच्छ कापडाने पुसा आणि नंतर वापरा.