Most Expensive Phone: स्मार्टफोन उद्योगात कंपन्या दररोज स्मार्टफोन लाँच करत असतात. कंपन्या आपले स्मार्टफोन एकामागून एक नवीन फीचर्ससह सादर करत आहेत. लोक त्यांच्या बजेट आणि सोयीनुसार स्मार्टफोन निवडतात. बाजारात बजेट ते प्रीमियम फोन उपलब्ध आहेत. ज्या लोकांचे बजेट चांगले असते ते सर्वोत्तम आणि सर्वात महाग स्मार्टफोन खरेदी करतात, यातच आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या उद्योगपती मुकेश अंबांनी यांची पत्नी निता अंबानी यांच्याकडे जगातील सर्वात महागडा असा मोबाईल फोन असल्याची चर्चा सुरु आहे. पण हे खरं आहे का? नीता अंबानी सर्वात महागडा फोन वापरतात का.., चला तर जाणून घेऊया नेमकं सत्य काय..?

जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीत अंबानी कुटुंबाच नाव सामील होतं. अर्थातच भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत अंबानी हे नाव आघाडीवर आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी उद्योगपती मुकेश अंबानी यांची ओळख आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब महागड्या छंदांसाठी नेहमीच ओळखले जाते. उद्योगपती मुकेश अंबांनी यांची पत्नी नीता अंबानींचं राहणीमान हे नेहमीच त्यांच्या प्रतिष्ठेला शोभणारं असंच आहे. त्यांचं राहणीमान, त्यांचे कपडे, आलिशान घड्याळं, ब्रँडेड सँडल, महागडे परफ्युम हे सगळंचं नेहमीच चर्चेचा विषय असतो.

Father struggles to save 9-year-old daughter from tiger father daughter bond video viral on social media
शेवटी बाप हा बापच असतो! ९ वर्षाच्या मुलीला वाघापासून वाचवण्यासाठी बापाची धडपड, VIDEO पाहून काळजात भरेल धडकी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
pune fraud latest news in marathi
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची ३२ लाखांची फसवणूक
Fraud of nine lakhs on pretext of investing in stock market
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने नऊ लाखांची फसवणूक
China Chinese Artificial Intelligence startup DeepSeek
अमेरिकेच्या ‘टुकार’ चिपनिशी चीनचा भन्नाट तंत्राविष्कार…चायना-मेड ‘DeepSeek’ चॅटबोटने जगभर खळबळ का उडवली?
Mamta Kulkarni net worth
५२ व्या वर्षी संन्यास घेणाऱ्या मराठमोळ्या ममता कुलकर्णीची संपत्ती किती? वाचा…
R Madhavan wife Sarita thinks he is a fool
“माझ्या पत्नीला वाटतं की मूर्ख आहे”, आर माधवन मराठमोळ्या बायकोबद्दल असं का म्हणाला?
IMEI Number for mobile phone
चोरी गेलेला मोबाईल पुन्हा मिळवण्यासाठी IMEI नंबर आहे महत्त्वाचा, कसा मिळवाल ‘हा’ क्रमांक? जाणून घ्या

आता नीता अंबानी या जगातील सर्वात महागडा असा मोबाईल फोन वापरतात, अशी चर्चा रंगली आहे आणि या फोनची किंमत ऐकली तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना घाम फुटेल. त्या जो फोन वापरतात त्याची किंमत ३९६ कोटी असल्याची चर्चा आहे. ‘Falcon Supernova iPhone 6 Pink Diamond’ हा जगातील सर्वात महागडा फोन मानला जातो, ज्याची किंमत भारतीय चलनात ३९६ कोटी रुपये आहे. हाच फोन नीता अंबानी वापरतात, अशी चर्चा आहे.

(हे ही वाचा:आयफोन १६ लाँच होण्यापूर्वी फिचर्स अन् डिझाईन आले समोर! जाणून घ्या काय होणार बदल…)

Apple ने २००४ मध्ये हा फोन लाँच केला होता. हा फोन पूर्णपणे २४ कॅरेट सोन्यापासून बनवला आहे. यावर प्लॅटिनमची कोटींग देखील आहे. त्यामुळे हा फोन पडला तरी तुटणार नाही. या फोनच्या मागे महागडा असा गुलाबी रंगाचा हिरा देखील आहे. हा फोन कोणाही हँक करू शकत नाही आणि जर हॅक करण्याचा प्रयत्न केलाच तर लगेचच त्याचा अलर्ट युजर्सला जातो. म्हणूनच या फोनची किंमत ३११ कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे.

मात्र, हा दावा खोटा असल्याचा खुलासा रिलायन्सच्या सूत्रांनी एका इंग्रजी साईटला केली आहे. नीता अंबानींकडे ‘Falcon Supernova iPhone 6 Pink Diamond’ फोन नाही, अशी माहिती रिलायन्सच्या सूत्रांनी दिली आणि ते कोणता फोन वापरतात, याविषयीही माहिती उपलब्ध झालेली नाही, असे वृत्त डीएनए इंडियाने दिले आहे.

Story img Loader