अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक सोशल मीडिया व्यासपीठ सुरु केलं आहे. या सोशल मीडिया अॅपचं नाव Truth Social असं ठेवण्यात आलं आहे. या अॅपच्या माध्यमातून ट्विटरपेक्षा अधिक मनमोकळेपणाने लोकं आपली बाजू मांडू शकतील, असा दावा करण्यात आला आहे. मात्र या अॅपचा चुकीचा वापर करणाऱ्या काही युजर्जंना प्रतिबंधित करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे हजारो युजर्स या अॅपवर खातं उघडण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. ट्रम्पच्या ट्रुथ सोशल अॅपमध्ये प्लॅटफॉर्मवर काय पोस्ट केले जाऊ शकते, या संदर्भात अधिक कठोर नियम असल्याचे दिसते. जर नियंत्रकांना काही सामग्री खोटी, बदनामीकारक किंवा दिशाभूल करणारी आहे असे वाटत असेल तर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकांवर बंदी घालू शकतात. जे लोक ट्रुथ सोशल अॅप वापरत आहेत त्यांना आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी बंदी किंवा निलंबित केले जाऊ शकते. ट्रुथ सोशल अॅप सध्या यूएसमध्ये राहणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. हे Android वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या Truth Social मीडिया अॅपची क्रेझ, अनेक जण वेटिंगवर तर काही जणांवर प्रतिबंधांत्मक कारवाई
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक सोशल मीडिया व्यासपीठ सुरु केलं आहे. या सोशल मीडिया अॅपचं नाव Truth Social असं ठेवण्यात आलं आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-02-2022 at 13:47 IST
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump truth social app banning people for inappropriate reasons rmt