WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. त्यामध्ये व्हॉइस व व्हिडीओ कॉलिंग करता येते. आपले फोटो किंवा अन्य माहिती एकमेकांना शेअर करता येते. तसेच आपले फोटो व्हिडीओ स्टेटसला पोस्ट करता येतात. भारतामध्ये २ अब्ज पेक्षा जास्त वापरकर्ते WhatsApp वापरतात. याची मूळ कंपनी Meta कंपनी आहे. सध्या कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन फीचर्स रोलआऊट करत आहे. त्यामध्ये वापरकर्त्यांची प्रायव्हसी सुरक्षित राहावी म्हणून देखील कंपनीने चॅट लॉक हे फिचर लॉन्च केले आहे.

तसेच जसे आता आपल्याला हवे असलेले चॅट आपण लॉक करू शकतो. त्या चॅटचे नोटिफिकेशन आपल्याला डिस्प्लेवर दिसणार नाही आहे. तसेच कंपनीच्या काही फीचर्समुळे आपल्याला आपले लास्ट सिन देखील बंद करता येते. मात्र स्कॅम करणारे एकापेक्षा एक नवीन प्रकार शोधात आहेत. अनेक whatsapp वापरकर्त्यांना नोकरीची खोट्या ऑफर्स आणि वर्क फ्रॉम होम असे आमिष दाखवण्यात आले. त्यांनतर वापरकर्ते त्या स्कॅममध्ये अडकल्याने त्यांना आपली जीवनभराची बचत गमवावी लागली. आज आपण WhatsApp स्कॅमपासून कसे वाचता येऊ शकते व त्यासाठी काय करता येऊ शकते हे जाणून घेऊयात.

pager blasts in Lebanon marathi news
विश्लेषण: लेबनॉन पेजर-स्फोट मालिकेमागे कोणाचा हात? हेझबोलाला धडा शिकवण्यासाठी इस्रायलची क्लृप्ती?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
amla and dates as powerful alternatives to beetroots and pomegranates for anemia treatment
तुम्हाला ॲनिमिया आहे अन् बीटरुट व डाळिंब खायला आवडत नाही? मग तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ दोन फळे खा
Bajaj Triumph New Speed 400
Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी येतेय ‘ही’ नवीन बाईक, जबरदस्त लूक, ३३४ सीसी इंजिन अन्…; जाणून घ्या किंमत, फीचर्स
Bananas and Curd
केळी आणि दह्याचे एकत्रित सेवन लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
Fresh ginger vs dried ginger: Which is better for your health?
ताजे आले की वाळलेले आले? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर; जाणून घ्या कोणते आले वापरायचे?
parents on rent in china
‘या’ देशात मुलांचे संगोपन करण्यासाठी भाड्याने मिळतात आई-वडील; ‘प्रोफेशनल पॅरेंट’ ही संकल्पना नक्की काय आहे?
BSNL unveils 365 day plan
वर्क फ्रॉम होम करताय? तुमच्यासाठी BSNL चा ‘हा’ रिचार्ज ठरेल बेस्ट? किंमत किती ? जाणून घ्या

हेही वाचा : SmartPhones Under 25000: Realme पासून Lava पर्यंत ‘हे’ आहेत बेस्ट स्मार्टफोन; १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि…, जाणून घ्या फीचर्स

अनोळखी नंबरवरून आलेल्या WhatsApp कॉल उचलू नये

सध्याच्या काळामध्ये whatsapp वर आंतरराष्ट्रीय नंबरवरून येणाऱ्या कॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ज्याने भारत सरकारचे लक्ष वेधले आहे. स्कॅम करणारी लोकं रँडम वापरकर्त्यांना कॉल करतात. हे नंबर शक्यतो लीक झालेल्या डेटा बेसमधून मिळवले जातात. त्यांनतर हे स्कॅमर्स वापरकर्त्यांना खोट्या नोकरीचे आमिष दाखवतात व तिथे नोकरीसाठी काही रक्कम आगाऊ भरावी लागेल असे सांगतात. कोणतीही खरी कंपनी नोकरीसाठी पैशांची मागणी करत नाही. जर फोनवर नोकरीसाठी तुमच्याकडे पैशांची मागणी झाली असेल तर तो कॉल फेक आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

WhatsApp वरील अज्ञात नंबरवरून कधीही कॉल उचलू नका. अशा नंबरवरून कॉल आल्यास तो त्वरित ब्लॉक करणे आवश्यक आहे. जेणेकरून ते पुन्हा तुम्हाला कॉल करू शकणार नाहीत व तुमचे नुकसान होण्यापासून देखील वाचता येईल.

अनोळखी नंबरवरून आलेल्या WhatsApp कॉलला रिप्लाय करू नये

तुम्ही नियंती करत असलेल्या नोकरीपेक्षा जास्त पगार देणारी किंवा वर्क फ्रॉम काम करण्याची संधी मिळेल असे अनेक मेसेज तुम्हाला whatsapp वर येत असतील. त्यातील एकही मेसेजला रिप्लाय देऊ नये. जर का तो एक व्यावसायिक नंबर असल्यास त्यावर ग्रीन टिक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. जे सूचित करते की हा नंबर WhatsApp वर अधिकृतपणे सूचिबद्ध आहे.

जर का तुम्हाला एखादा आंतराष्ट्रीय कॉल आल्यास किंवा त्यावरून मेसेज आल्यास सगळ्यात महत्वाची नंबर ब्लॉक केला पाहिजे. तुमचे नातेवाईक किंवा मित्र प्रदेशामध्ये राहत असले तर त्यांच्याकडून खात्री केल्याशिवाय त्या नंबरला रिप्लाय देऊ नये.

हेही वाचा : टेलिकॉम क्षेत्रात उडाली खळबळ! ‘ही’ कंपनी आपल्या ११ हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ

या महत्वाच्या प्रायव्हसी सेटिंग्समध्ये बदल करावा

WhatsApp > Settings > Privacy वर जाऊन लास्ट सीन, प्रोफाइल फोटो, अबाऊट आणि स्टेटस हे पर्याय माय कॉन्टॅक्टस किंवा नोबडीमध्ये जाऊन अ‍ॅडजस्ट करावेत. त्याचप्रमाणे त्याच प्रायव्हसी मेनूमध्ये , ग्रुप्समध्ये जावे आणि ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यासाठी माय कॉन्टॅक्टस हा पर्याय निवडावा. हे सेटिंग तुम्हाला अज्ञात ग्रुप्समध्ये समाविष्ट करण्यापासून रोखते.