स्मार्टफोन हा आता प्रत्येकाच्या रुटीनचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. सतत काहीनाकाही कामानिमित्त किंवा काम नसेल तरीही मोबाईल चेक करत राहण्याची आपल्याला सवय लागली आहे. ही सवय लागण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे ऑनलाईन गेम्स. अनेकजण विशेषतः तरुण मंडळी जिथे शक्य असेल तिथे सतत ऑनलाईन गेम्स खेळण्यात मग्न झालेली दिसून येतात. ताण कमी करण्यासाठी, विरंगुळा म्हणून अशा ऑनलाईन गेम्समध्ये सहभाग घेतला जातो.

बऱ्याचवेळा प्रवास करत असताना अनेकजण ऑनलाईन गेम्स खेळताना दिसतात. अशावेळी लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर शक्य नसल्याने मोबाईलवरच हे गेम्स खेळले जातात. पण मोबाईलमध्ये लॅपटॉपएवढे स्टोरेज उपलब्ध नसते, त्यामुळे काही गेम्स डाउनलोड करता येत नाहीत. फोनचे स्टोरेज, रॅम कमी असल्याने जर त्यावर ऑनलाइन गेम्स खेळता येत नसतील, तर काही वेबसाईट्सवरुन गेम्स डाउनलोड न करता मोफत खेळू शकता. कोणत्या आहेत या वेबसाईट्स जाणून घ्या.

Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह
Where a giant animal like a dinosaur was destroyed, what happened to microscopic organisms! Man should take the initiative to protect biodiversity know more about
जैवविविधतेच्या संरक्षणासाठी माणसानेच पुढाकार घ्यावा
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
My Name The Night Agent Vincenzo The Glory
नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? रविवारी पाहा ‘या’ जबरदस्त सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज, वाचा यादी

आणखी वाचा : फोन नेहमी दिसेल नव्यासारखा! फक्त वापरा ‘या’ ट्रिक्स

या वेबसाईट्सवरून खेळा फ्री ऑनलाईन गेम्स

  • मोफत ऑनलाईन गेम खेळण्यासाठी क्रोम ब्राउजरवर अ‍ॅडीकटिंग गेम्स (Addicting Games) सर्च करा.
  • या वेबसाईटवर असंख्य मोफत गेम्स उपलब्ध आहेत.
  • पजल (Puzzel), एक्शन (Action), शूटिंग (Shooting), कार रेसिंग (Car Racing), स्पोर्ट्स (Sports) हे आणि अशा बऱ्याच कॅटेगरीमधील गेम्स या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

फ्री गेम्स उपलब्ध असणाऱ्या काही वेबसाईट्स

  • सतत एकच किंवा एकाच प्रकारचे गेम्स खेळून कंटाळा आला असेल तर तुम्ही ‘आर्मर गेम्स’ (Armor Games) या वेबसाईटवरून गेम्सची निवड करू शकता.
  • यावर दर आठवड्याला नवीन गेम अपलोड केले जातात.
  • तसेच या गेम्सना डाउनलोड करण्याची गरज नसते, तुम्ही ऑनलाईन देखील खेळू शकता.
  • Kongregate आणि FOG (फ्री ऑनलाईन गेम्स) या वेबसाईटवर अनेक ऑनलाईन गेम्स उपलब्ध आहेत.
  • मल्टीप्लेअर गेम्स, फ्लाइंग गेम्स, अ‍ॅडवेंचर गेम्स, डिफेन्स गेम्स अशा कॅटेगरी उपलब्ध आहेत.
  • या वेबसाईट्सवरुन मोबाईल आणि लॅपटॉप दोन्हीवर मोफत गेम्स डाउनलोड करता येतात.