पासवर्ड कुठलाही असो तो गुप्तपणेच ठेवला जातो. मात्र, गुप्त ठेवण्याच्या पध्दती वेगळया असू शकतात. कोणी वैयक्तिक डायरित लिहून ठेवतो तर कोणी मोबाईलमध्ये किवा मोबाईलच्या जी-मेल मध्ये. परंतु, आपली वैयक्तिक डायरी हरवली, मोबाईल खराब झाला तर काय कराल? अशावेळी आपला नक्कीच गोंधळ उडतो. मात्र, अजिबात काळजी करू नका. तुमचा नवा पासवर्ड जनरेट करण्यात मदत करतील या टिप्स…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘यूएएन नंबर’ करेल तुमची मदत

पीएफ खातेदारांना ऑनलाइन पैसे काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पीएफशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा ‘यूएएन नंबर’ माहित असणं आवश्यक असते. यूएएन क्रमांक वापरून तुम्ही तुमचे पीएफ खाते चेक करू शकता. याशिवाय पीएफ खात्याशी संबंधित इतर अनेक कामेही करता येतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्याशी संबंधित सर्व सेवा यूएएन पोर्टलद्वारे पुरवते. तुम्ही तुमची सर्व पीएफ खाती एकाच यूएएन क्रमांकाने लिंक करू शकता.अशावेळी नोकरी बदलल्यावर ‘यूएएन नंबर’ बदलण्याची गरज नसते.

आणखी वाचा : खुशखबर! इतक्या कमी दरात वनप्लसचा ‘हा’ स्मार्टफोन बाजारात लाँच; भन्नाट फीचर्ससह मिळणार बरचं काही…

‘यूएएन’पासवर्ड रीसेट करण्याच्या ‘या’सोप्या स्टेप्स…
या सोप्या स्टेप्स फॉलो करून आपण पासवर्ड रीसेट करू शकता. चला तर आपल्या मोबाईलवरून फॉलो करा या स्टेप्स.

  • सर्वप्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in./memberinterface/ येथे ईपीएफओ पोर्टलला भेट द्या.
  • UAN, पासवर्ड आणि कॅप्चा बॉक्सच्या खाली Forgot Password वर क्लिक करा.
  • नवीन पेजवर तुमचा UAN नंबर टाका.
  • खाली दिलेल्या कॅप्चा बॉक्समध्ये कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  • आता सबमिट बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा UAN पासवर्ड पुन्हा एंटर करा.
  • तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा आणि OTP प्राप्त करण्यासाठी होय वर क्लिक करा.
  • OTP टाका आणि Verify पर्यायावर क्लिक करा.
  • एकदा सत्यापित केल्यावर, तुम्हाला दोनदा नवीन पासवर्ड प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.
  • शेवटी सबमिट वर क्लिक करा आणि नवीन पासवर्डसह लॉग इन करा.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont worry if you forgot your pf account password pdb
Show comments