Download documents on Whatsapp : व्हॉट्सअॅपचा मेसेजिंग आणि कॉलिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण तुम्हाला माहितीये का? व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तुम्ही पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, मार्कशीट आणि इतर खासगी कागदपत्रे मिळवू शकता. व्हॉट्सअॅप चॅटबॉट वापरून तुम्हाला ही कागदपत्रे मिळू शकतात.
सरकारची व्हॉट्सअॅप चॅटबॉटवर आधारीत सेवा आहे जी महत्वाचे कागदपत्रे डिजिलॉकरच्या माध्यमातून तुम्हाला व्हॉट्सअॅपवर देऊ शकते. डिजिलॉकर उपक्रम या वर्षीच्या सुरुवातीला सुरू करण्यात आला होता. परंतु, अनेक वापरकर्ते अजूनही या सुविधेबद्दल अनभिज्ञ आहेत. सरकारला सहजरित्या आपल्या सेवा देता याव्यात असा या व्हॉट्सअॅप चॅटबॉटचा हेतू आहे. या व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या माध्यमातून काही सेकंदातच वापरकर्त्याला पाहिजे ती कागदपत्रे मिळवता येतात. यासाठी मायजीओव्ही (MyGov) हेल्पडेस्क चॅटबॉटचा व्हॉट्सअॅपवर वापर करावा लागेल.
(आता ऑफिसमध्ये खाता येईल गरम अन्न, जाणून घ्या मिल्टन स्मार्ट टिफीनचे भन्नाट फीचर्स आणि किंमत)
व्हॉट्सअॅपवर डिजिलॉकर सेवा वापरण्यासाठी तुम्हाला आधी खाते प्रमाणित करावे लागेल. ते केल्यावर तुम्हाला, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर कागदपत्रे व्हॉट्सअॅपवरून मिळवता येतील.
कोणती कागदपत्रे मिळू शकतील?
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- दहावीची मार्कशीट
- बाराविची मार्कशीट
- दहावी सीबीएसई पासिंग सर्टिफिकेट
- व्हेइकल रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
- दुचाकीची इन्श्युरन्स पॉलिसी
- इन्श्युरन्स पॉलिसीचे कागदपत्र
असे करा डाऊनलोड
आधी डिजिलॉकरवर खाते उघडा. तुमचे आधीच खाते असेल तर कागदपत्रे मिळवणे सोपे जाते. डिजिलॉकरवर खाते उघडण्यासाठी साईनअप करावे लागेल. यासाठी तुम्हाला आधार कार्डची माहिती, फोन नंबर, ईमेल आयडी, जन्म तारखेबाबत माहिती द्यावी लागेल. खाते उघडल्यानंतर मायजीओव्ही चॅटबॉट मिळवण्यासाठी व्हॉट्सअॅपवर पुढील स्टेप्स करा.
(‘या’ दिवशी लाँच होणार LAVA BLAZE 5G, फोनमध्ये व्हर्च्युअल रॅमसह मिळणार बरेच काही, किंमत केवळ..)
- मायजीओव्ही चॅटबॉटसाठी तुम्हाला +९१९०१३१५१५१५ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर नमस्ते किंवा हाय किंवा डिजिलॉकर असे मेसेज करावे लागेल.
- डिजिलॉकर असा मेसेज केल्यानंतर ‘वेल्कम टू डिजिलॉकर सर्व्हिसेस टू डाऊनलोड/इश्यू युअर डॉक्युमेंट्स’ असा रिप्लाय तुम्हाला येईल.
- त्यानंतर युजरला त्याच्या डिजिलॉकर खात्याबद्दल माहिती द्यावी लागेल. युजरला आधार कार्ड क्रमांक द्यावा लागेल. हे केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत ओटीपी डिव्हाइसवर तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाईल.
- ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला डिजिलॉकरमधील तुमची कागदपत्रे व्हॉट्सअॅपवरून डाऊनलोड करता येतील.