ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आणत आहे. अनेक क्षेत्रात ड्रोनच्या वापरालाही मान्यता देण्यात आली आहे. २०२२ चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्र सरकारने ड्रोनशी संबंधित एक मोठी घोषणा केली. मोबाईल आणि कॉम्प्युटर सारखाच दैनंदिन जीवनात ड्रोनचाही समावेश करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात ड्रोन पायलटचीही गरज भासणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भविष्यातील ड्रोन पायलटची गरज लक्षात घेता १० राज्यांमध्ये ड्रोन पायलटच्या प्रशिक्षणासाठी १८ शाळा उघडण्यात आल्या आहेत. बहुतांश ठिकाणी केवळ खासगी फ्लाइंग क्लबना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ४ प्रशिक्षण शाळांपैकी दोन शाळा पुण्यात, एक मुंबईत आणि एक बारामतीमध्ये उघडण्यात आली आहे. डीजीसीएच्या वेबसाइटवर डिजिटल स्काय नावाच्या प्लॅटफॉर्मवर ड्रोनशी संबंधित अधिक माहिती पाहता येईल.

१० राज्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अलीगढ, यूपीमधील धानीपूर हवाई पट्टीवर दोन ड्रोन पायलट प्रशिक्षण शाळा उघडण्यात आल्या आहेत. हरियाणात गुरुग्राममध्ये तीन आणि बहादूरगडमध्ये एक शाळा उघडण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, गुजरातमधील अहमदाबाद, हिमाचल प्रदेशातील शाहपूर, झारखंडमधील जमशेदपूर, कर्नाटकातील बंगलोर, यूपीमध्ये दोन आणि हरियाणामध्ये चार शाळा सुरू झाल्या आहेत. तेलंगणातील सिकंदराबाद आणि हैदराबादमध्ये प्रत्येकी एक शाळा उघडण्यात आली आहे. तामिळनाडूतील चेन्नई येथे एक प्रशिक्षण शाळा उघडण्यात आली आहे. देशभरात फक्त १८ शाळा उघडण्यात आल्या आहेत.

Investment करण्याचा विचार करत आहात? जाणून घ्या, कशी आणि कुठून सुरु करावी पहिली गुंतवणूक

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय, कृषी, पंचायती राज, संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार, खाणकाम, वाहतूक, वीज, पेट्रोलियम आणि वायू, पर्यावरण आणि माहिती प्रसारण या क्षेत्रात ड्रोनचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मेघालयात कोरोना लसीच्या पुरवठ्यासाठी ड्रोन वापरण्याची परवानगी देण्यात आली होती.

ड्रोनच्या वजनानुसार त्यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ठेवण्यात आले आहेत. २५० ग्रॅम किंवा त्याहून कमी वजनाच्या ड्रोनला नॅनो ड्रोन म्हटले जाईल. यापेक्षा जास्त वजनाच्या मायक्रो किंवा मिनी ड्रोनसाठी यूआयडी व्यतिरिक्त इतर नियमांचे पालन करणे आवश्यक असेल.

नवीन नियमांनुसार, २५० ग्रॅम ते २ किलो वजनाचे मायक्रो ड्रोन, २ किलो ते २५ किलो, २५ किलो ते १५० किलो वजनाचे मिनी ड्रोन, तसेच त्याहून अधिक वजनाच्या ड्रोनमध्ये युआयडी प्लेट व्यतिरिक्त आरएफआयडी/सिम, जीपीएस, आरटीएच (रिटर्न टू रिटर्न) आणि अँटी कॉलिजन लाइट लावणे आवश्यक आहे. मात्र, २ किलोपेक्षा जास्त वजनाच्या मानवरहित मॉडेलच्या विमानावर फक्त आयडी प्लेट लावावी लागणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drone pilot training centers to be started in 10 states of the country training will be imparted in 18 schools pvp