सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने खूप थंडी पडत आहे. थंडीपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी अनेकजण स्वेटर कानटोपी घालूनच घराबाहेर पडताना दिसतं आहेत. अशातच आता थंडीपासून आपलं संरक्षण करणारी USB इलेक्ट्रिक शाल बाजारात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता थंडीपासून आपला बचाव करणं सोपं होणार आहे.
ही शाल तुमचे संपूर्ण शरीर उबदार ठेवते शिवाय ती वापरायलाही खूप सोप्पी आहे आणि त्याची किंमतही जास्त नाही. नावाप्रमाणेच, ते वापरण्यासाठी तुम्हाला ते USB शी कनेक्ट करताच ती गरम होऊ लागते. थंडीपासून संरक्षण करणारी ही यूएसबी इलेक्ट्रिक हीटिंग शाल ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही बाजारात उपलब्ध आहे. शिवाय कंपनी या शालवर डिस्काउंट आणि ऑफर्सही देत आहे. त्यामुळे तुम्ही कमी खर्चात इलेक्ट्रिक हिटिंग शाल खरेदी करू शकता. या शालबाबतची सर्व माहिती आपण जाणून घेऊया.
हेही पाहा- घरात मोबाईल नेटवर्कची समस्या उद्भवतेय? शेजारी कोणी ‘हे’ मशीन लावलं आहे का तपासा
USB इलेक्ट्रिक हीटिंग शॉल तुम्ही Amazon वरून खरेदी करू शकता. यूएसबी इलेक्ट्रिक हीटिंग शॉलचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. तुम्ही ६ ते १२ हजार रुपयांपर्यंत हीटिंग शॉल खरेदी करू शकता. या किंमतीवर कंपनीकडून तुम्हाला सुटही दिली जात आहे.
वैशिष्ट्य –
यूएसबी इलेक्ट्रिक शालच्या वैशिष्ट्याबद्दल बोलताना, कंपनीने सांगितले आहे की ती सहा स्टेप्समध्ये सहजपणे वेगळी केली जाऊ शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या शालचा आकार 1000x700mm आहे. तर शालमध्ये हीटिंग लाइट, हीटिंग पॅड आणि स्विच कंट्रोलर आहे. अॅमेझॉनवर ब्लू, ब्राऊन आणि ग्रे रंगांच्या पर्यायांमध्ये शाल उपलब्धआहे.
हेही वाचा- आता Whatsapp वरून करता येणार कॅब बुक; फक्त ‘या’ नंबरवर पाठवा Hi; खूपच सोपी आहे ट्रिक्स
ते चालू करण्यासाठी, तुम्हाला त्याची USB केबल पॉवर बँक, लॅपटॉप किंवा अन्य उपकरणाशी जोडावी लागेल. ही शाल थेट चार्जरशी कनेक्ट करूनही वापरले जाऊ शकते. शिवाय या शालवर डोकं ठेवूनही तुम्ही झोपूही शकतास तिचा वापर कार, ऑफिस किंवा इतर ठिकाणी करता येईल असा कंपनीचा दावा आहे.