एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरचे नाव बदलून एक्स असे केले आहे. म्हणजेच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ‘एक्स’ या नावाने ओळखले जाते. तसेच मस्क यांनी कंपनीचा लोगो देखील बदलला आहे. मस्क आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवनवीन फीचर्स किंवा अपडेट्स आणि अन्य गोष्टी लॉन्च करत असतात. एलॉन मस्क यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) लवकरच नवीन दोन सबस्क्रिप्शन प्लॅन लॉन्च करणार आहे. मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक कमी किंमतीचा प्लॅन लॉन्च करेल ज्यामध्ये सर्व प्रीमियम फीचर्स असतील मात्र त्यामध्ये वापरकर्त्यांना जाहिराती दिसणार आहेत. तर दुसरा प्लॅन हा अधिक महागडा असेल मात्र त्यामध्ये जाहिराती दिसणार नाहीत. या बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एलॉन मस्क यांनी याबाबत एक्स वर एक पोस्ट केली आहे. एक वर पोस्ट करत मस्क म्हणाले, “एक्स प्रीमियम सबस्क्रिप्शनचे दोन नवीन प्लॅन्स लवकरच लॉन्च होतील. एक तर कमी किंमतीमध्ये सर्व सुविधा मात्र जाहिरातींसह, तर दुसरा अधिक महागडा प्लॅन असेल मात्र त्यामध्ये जाहिराती नसतील.” याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : OnePlus Open Top Features: सोनीचा पॉवरफुल कॅमेरा सेन्सर आणि ‘या’ टॉप फीचरसह ‘वनप्लस ओपन’ फोल्डेबल लॉन्च, जाणून घ्या

एलॉन मस्क यांच्या एक्स द्वारे ही घोषणा करण्यात आली आहे, जेव्हा न्यूझीलंड आणि फिलिपाइन्समध्ये वापरकर्त्यांसाठी प्रत्येक वर्षी १ डॉलरची ‘नॉट-बॉट’ सबस्क्रिप्शन प्लॅन चार्ज करण्याचा पायलट प्रोजेक्ट केल्यानंतर काही दिवसांनी करण्यात आली आहे.

हेही वाचा : OnePlus Open launch Video: भारतात लॉन्च झाला फोल्डेबल स्मार्टफोन; सेल्फी कॅमेऱ्यामध्ये मिळणार फेस अनलॉकसह ‘हे’ फीचर्स, किंमत…

एक्स प्रो अंतर्गत एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर आतापर्यंत फक्त एकच सबस्क्रिप्शन मॉडेल होते. वेबसाइटवरून खरेदी केल्यावर एक्स प्रो ची किंमत एक महिन्यासाठी ६५० रुपये इतकी आहे. एक्स च्या iOS किंवा Android अ‍ॅप्लिकेशनद्वारे सबस्क्रिप्शन घेतल्यास वापरकर्त्यांना ९०० रुपये मोजावे लागतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk announce two new subscription launch soon for x users check all details tmb 01