Elon Musk Shares Meme on Brazil Ban X : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, तसेच स्पेसएक्स व टेस्ला या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क हे समाजमाध्यमांवर खूप सक्रीय असतात. बऱ्याचदा ते एक्स या त्यांच्या मालकीच्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर गंमतीशीर पोस्ट करत असतात, मीम्स शेअर करत असतात. दरम्यान, ब्राझीलमध्ये एक्सवर घातलेल्या बंदीवरून मस्क यांनी एक गंमतीशीर मीम एक्सवर शेअर केलं. मात्र या मीममधील एका चुकीमुळे मस्क ट्रोल होऊ लागले आहेत. कारण त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एक्स ऐवजी ट्विटर असं म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी मस्क यांनी ट्विटर हा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म खरेदी केला. त्यानंतर कंपनीत त्यांनी अनेक बदल केले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट कंपनीचं नाव व लोगो बदलला आणि आता त्यांनी त्यांच्या कंपनीचा जुन्या नावाने उल्लेख केल्यामुळे ते ट्रोल होऊ लागले आहेत.
Elon Musk : ‘ट्विटर’चं नाव ‘एक्स’ केलंय हे एलॉन मस्कच विसरले? ब्राझीलबाबत पोस्ट करायला गेले अन्…
Elon Musk on Brazil Ban X : एलॉन मस्क यांनी एक्सच्या रिब्रँडिंगवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले आहेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-09-2024 at 12:20 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk calls x as twitter after brazil ban his social media platform asc