Elon Musk Claims Google: टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क हे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांवरून चर्चेत असतात. तर आज त्यांनी गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या गूगलवर निशाणा साधला आहे. तसेच निशाणा साधत त्यांनी असं म्हटले की, कंपनीने अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर सर्च इंजिन गूगलवर बंदी घातली आहे का? तर नेमकं ते असं का म्हणाले, हे प्रकरण नक्की काय आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
एलॉन मस्क यांनी एक्स (ट्विटर)वर एक स्क्रीनशॉट शेअर केला, त्यात असं दिसून येत आहे की, गूगलवर अध्यक्ष डोनाल्ड टाईप केल्यावर सर्च पर्यायामध्ये “अध्यक्ष डोनाल्ड डक” आणि “अध्यक्ष डोनाल्ड रेगन” असे दिसत आहेत. तेव्हा त्यांनी या गोष्टीचा स्क्रीनशॉट काढला. तसेच “व्वा, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर सर्च इंजिन गूगलने बंदी घातली आहे! निवडणुकीत हस्तक्षेप? गूगल निवडणुकीत व्यत्यय आणून स्वतःला खूप मोठ्या अडचणीत टाकत आहेत; अशी कॅप्शन लिहिली आहे. तुम्हीसुद्धा पाहा एलॉन मस्क यांची पोस्ट…
पोस्ट नक्की बघा…
गूगलकडून ऐका खरं उत्तर
हे पाहून एलॉन मस्कच्या अनेक फॉलोवर्सनी कमेंट केल्या आहेत. त्यातील एकाने कमेंट केली की, “तुम्हाला आवडत नसलेल्या अनेक खात्यांवर गूगल सर्च इंजिनकडून बंदी घातली जाते. फरक काय आहे?” तसेच एक्स (ट्विटर) वापरकर्त्यांनी Google मध्ये हत्येचा प्रयत्न टाइप केल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांचे यादीत नाव नाही, असे दर्शवणारे स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर या समस्येने आणखीन लक्ष वेधले. जेव्हा वापरकर्त्यांनी Chrome च्या incognito मोडमध्ये “ट्रम्पवर हत्येचा प्रयत्न” शोधलं, तेव्हा एंटर दाबल्यानंतर संबंधित बातम्यांचे लेख समोर आले.
तर आता हे बघता गूगलनेसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ‘कंपनी राजकीय परिणामांवर प्रभाव टाकण्यासाठी शोध परिणामांमध्ये फेरफार करत आहे’; असा एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोप केला होता. या आरोपांना गूगलने ठामपणे नाकारले आहे आणि विवादाला प्रतिसाद म्हणून सांगितले की, Google ने कोणतीही “मॅन्यूअल कृती” केलेली नाही. तसेच कंपनी त्यांच्या ऑटो कम्प्लिट फीचरच्या सुधारणेवर काम करत आहे, असेदेखील सांगितले.