Elon Musk हे ट्विटर सीईओ आहेत. ट्विटर हे एक मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. ट्विटरवर मस्क हे सतत काही ना काही अपडेट वापरकर्त्यांसाठी घेऊन येत असतात. आतासुद्धा कंपनी स्मार्ट टीव्हीसाठी Video App वर काम करत असल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले आहे. हे अ‍ॅप वापरकर्त्यांना त्यांच्या टीव्हीवर ट्विटर व्हिडीओ पाहण्याची परवानगी देणार आहे. तसेच लोकांना नवीन व्हिडीओ शोधणे देखील सोपे होणार आहे.

एलॉन मस्क यांनी १८ जून २०२३ रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये घोषणा केली. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की App ”येत” आहे. हे टीव्हीवर उपलब्ध होणार आहे. तसेचग त्यांनी या App बद्दल अधिक माहिती दिली नाही. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
Marathi actress Aishwarya Narkar Dance With Ashwini Kasar on Ranbir Kapoor song
Video: ऐश्वर्या नारकर यांनी अश्विनी कासारबरोबर केला सुंदर डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा : Airtel ने ५६ व ८४ दिवसांसाठी लॉन्च केले ‘हे’ रिचार्ज प्लॅन, दररोज २ जीबी डेटा आणि…

S-M रॉबिन्सन या ट्विटर वापरकर्त्याने लिहिले. ”आम्हाला खरोखरच स्मार्ट टीव्हीसाठी ट्विटर व्हिडीओ App ची आवश्यकता आहे. मी ट्विटरवर एका तासाचा व्हिडिओ पाहत नाही.” याला मस्क यांनी उत्तर देताना लिहिले की ”ते येत आहे.”

S-M रॉबिन्सन या ट्विटर वापरकर्त्याने मस्क यांच्या उत्तरला ट्विट करत उत्तर दिले. त्यामध्ये त्याने लिहिले हे कौतुकास्पद आहे. मी एक दिवस असा पाहू शकतो की जेव्हा मी YouTube चे सब्स्क्रिप्शन रद्द करू शकतो. आणि पुन्हा काहीही पाहणार नाही. ”

ट्विटरला व्हिडीओ केंद्रित प्लॅटफॉर्म बनवणे याबाबत मस्क गंभीर असल्याचे स्मार्ट टीव्हीसाठी व्हिडीओ App च्या घोषणेमुळे स्पष्ट होते. कंपनीने अलीकडच्या काळामध्ये व्हिडीओवर अधिक लसख दिले आहे. वापरकर्त्यांना व्हिडीओ पाहणे आणि शेअर करणे सोपे व्हावे यासाठी कंपनीने अनेक फीचर्स सुरू केली आहेत.

एलॉन मस्क यांनी अलीकडेच म्हटले होते की ते ट्विटरला अधिक आकर्षक प्लॅटफॉर्म बनवायचे आहे. तसेच त्यांनी अनेक बदलांची रूपरेषा सांगितली आहे. यातील सर्वात एक महत्वाचा बदल म्हणजे व्हिडीओ, क्रिएटर आणि कॉमर्स पार्टनरशिपवर लक्ष केंद्रित करणे. व्हिडीओ हे सोशल मीडियाचे भविष्य आहे. या ट्रेंडमध्ये ट्विटर आघाडीवर राहावे अशी मस्क यांची इच्छा आहे. तसे ते पुढे म्हणाले, वापरकर्त्यांसाठी ट्विटरवर व्हिडीओ पाहणे आणि शोधणे ही प्रक्रिया सोपी बनवायची आहे. जेणेकरून ते अधिकाधिक क्रिएटर्सला प्लॅटफॉर्मकडे आकर्षित करेल.

Story img Loader