ट्विटरची धुरा सांभाळल्यानंतर एलॉन मस्क धडाधड निर्णय घेत आहेत. त्यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह इतर उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर ब्लू टिकसाठी पैसे लागणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. तसेच, ट्विटरवरील अक्षर मर्यादेवर देखिल मोठा निर्णय ते घेतील असा अंदाज व्यक्त होत आहे. ट्विटरला ताब्यात घेतल्यानंतर ते एकापाठोपाठ एक निर्णय घेत आहेत. आता टिकटॉकला पर्यायी ठरू शकणाऱ्या अ‍ॅपवर काम करण्याच्या सूचना मस्क यांनी आपल्या अभियंत्यांना दिल्याचे समजले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एलॉन मस्क यांनी आपल्या अभियंत्यांना वाईन अ‍ॅपवर काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. हे अ‍ॅप या वर्षाच्या शेवटी उपलब्ध होऊ शकते. अ‍ॅक्सिओसच्या अहवालानुसार, अभियंत्यांना वाईन अ‍ॅपच्या ओल्ड कोड बेसवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाईन अ‍ॅप बंद झाल्यापासून त्याच्या ओल्ड कोड बेसमध्ये कुठलेही बदल किंवा अपडेट करण्यात आलेले नाही. या कोड बेसवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(क्रोम ब्राऊजर तातडीने अपडेट करा, गुगलचे आवाहन, सांगितले ‘हे’ मोठे कारण)

काय आहे वाईन अ‍ॅप?

वाईन अ‍ॅपवर अमर्यादित शॉर्ट व्हिडिओ रेकॉर्ड करून ते शेअर करता येत होते. तसेच त्यामध्ये ६ सेकंदांचे लुपिंग व्हिडिओ देखील बनवता येत होते. २०१२ साली ट्विटरने हे अ‍ॅप विकत घेतले, त्यानंतर ४ वर्षांनी हे अ‍ॅप विकून टाकले. ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी देखील वाईन अ‍ॅपची सेवा बंद करण्यावर खंत व्यक्त केली होती.

मस्कने दिले संकेत

रविवारी मस्क यांनी वाईन अ‍ॅप परत आणण्याचे संकेत दिले होते. त्यानी वाईन अ‍ॅपविषयी ट्विटरवर पोल केला होता. वाईन अ‍ॅप पुन्हा सुरू करायचे का? असा प्रश्न त्यांनी केला होता. पोलमध्ये ४९ लाख २० हजार १५५ मत पडले होते. ६९.६ टक्के लोकांनी वाईन अ‍ॅप पुन्हा लाँच करण्याच्या बाजूने मत दिले होते. तर, ३०४ टक्के लोकांनी नको म्हणून मत दिले होते.

(चुकीच्या पत्त्यावर ईमेल गेलाय? ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करून परत मिळेल ईमेल)

लोकप्रिय युट्युबर मिस्टर बिस्टने मस्क यांना पोलवरून प्रश्न केला होता. तुम्ही असे केल्यावर टीकटॉकशी स्पर्धा केल्यास ते खूप हास्यास्पद ठरेल असे त्यांनी म्हटले होते. त्यावर वाईन अ‍ॅप टीकटॉकपेक्षाही चांगले करण्यासाठी आम्ही काय करू शकतो? असा प्रश्न मस्क यांनी केला होता. यावरून मस्क वाईन अ‍ॅप पुन्हा लाँच करण्यासाठी उत्सुक्त असल्याचे संकेत मिळतात.