सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) हे एक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे; ज्यात तुमची मते, विचार मांडण्यासाठी पोस्ट शेअर केल्या जातात. तसेच २०२२ मध्ये टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी एक्स (ट्विटर) खरेदी केले तेव्हा ॲपमध्ये मोठे बदल करण्यात आले. तर आता एलॉन मस्क आणखीन एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनेक ॲप्समध्ये आपल्याला ॲडल्ट कन्टेन्ट दिसतात. मात्र, असे कन्टेन्ट रिपोर्ट केल्यानंतर ते काढून टाकण्यात येतात. तर, लवकरच एक्स (ट्विटर)वर सुद्धा या फीचरचा उपयोग युजर करू शकणार आहेत. भविष्यात ॲडल्ट कन्टेन्ट लेबलसह प्रसिद्ध केले जाईल. एक्स (ट्विटर) वापरकर्त्यांना ‘ॲडल्ट कन्टेन्ट ग्रुप’ तयार करण्यास अनुमती देऊन नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा…आता मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये दिसणार नाही वर्डपॅड! तुम्ही कोणत्या ॲप्सचा करू शकता उपयोग? पाहा यादी…
ब्लूमबर्गने दिलेल्या अहवालानुसार वापरकर्त्यांना ‘ॲडल्ट सेन्सिटिव्ह कन्टेन्ट’ असणारे लेबल दर्शविण्यात येणार आहे. हा उपाय सर्व वापरकर्त्यांच्या सुरक्षेच्या उद्दिष्टाने आणला जाणार आहे. जेव्हा एक्स (ट्विटर) वापरकर्त्यांसाठी पहिल्यांदा ॲडल्ट कन्टेन्ट ग्रुप हा पर्याय सादर केला तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या निर्णयामुळे प्लॅटफॉर्मच्या हेतूंबद्दल अनुमान काढले जाऊ लागले. काही जण तर असेही म्हणू लागले की, ॲडल्ट कन्टेन्ट ॲप हे कमाई करण्याचे एक साधन आहे. पण, एक्स (ट्विटर)ने यावर जोर दिला की, हे फीचर म्हणजे प्रामुख्याने सुरक्षेच्या दृष्टीने एक उपाय आहे. तसेच हा पर्याय केवळ योग्य वयाचे वापरकर्ते नॉट सेफ फॉर कन्टेन्ट (Not Safe For Work / Content)मध्ये प्रवेश करू शकतील. ही भूमिका प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांची सुरक्षा आणि संयम यासाठी बांधिलकी दर्शविते.
ॲडल्ट कन्टेन्ट क्रिएटर्सना सबस्क्रिप्शन देण्यात येईल. या कल्पनेचा आधीपासूनचा विचार करण्यात आला होता; पण आता सुरक्षिततेच्या कारणास्तव शेवटी हा निर्णय घेण्यात आला आहे. विश्वास आणि सुरक्षा वाढविण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांमुळे एक्स (ट्विटर) प्लॅटफॉर्म भविष्यात या निर्णयाची पुनरावृत्ती करू शकतो, असे सांगण्यात आले आहे