Twitter Logo : ट्विटर खरेदी केल्यापासून एलॉन मस्क कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत येत आहेत. आतापर्यंत त्यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. रविवारी सकाळी, एलॉन मस्क यांनी जगभरातील लोकांना सांगितले की ते अनेक वर्षांपासून ओळखत असलेल्या ब्लू बर्ड लोगोला निरोप देण्याची तयारी करा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मोठ्या पातळीवरील रीब्रँडिंगचा एक भाग म्हणून, मस्क यांनी ब्लू बर्ड लोगो बदलून तो X मध्ये बदलला. मस्कने सांगितले होते की, जर चांगला लोगो सापडला तर तो दुसऱ्या दिवशी लाइव्ह होईल. आपल्या शब्दांवर ठाम राहात त्यांनी सोमवारपर्यंत Twitter चा आयकॉनिक ब्लू बर्ड लोगो बदलला आणि Twitter च्या अधिकृत हँडलचे नाव देखील X असे केले गेले. वेब ब्राउझरवर साइट उघडताना दिसणारे Twitterचे ब्लू बर्ड लोगोची जागा देखील आता नवीन लोगो घेतली आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण आता असे दिसते की, नवीन ट्विटर लोगोबाबत मस्क अजूनही गोंधळलेला आहे. नुकतेच त्यांनी नव्या X लोगोला वेगळ्या रूपात बदलले होते परंतु नवीन लोगोच्या जाड रेषा त्याला आवडल्या नाही म्हणून त्यांनी केलेला बदल परत मागे घेतला.

इलॉन मस्कने ट्विटरचा लोगो दोनदा बदलला

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा नवीन लोगो दाखवणारा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या लोगोमध्ये मूळ X लोगोपेक्षा किंचित जाड रेषा आहेत. जरी नवीन X लोगोने Twitterच्या ब्लु बर्डची जागा घेतली असली तरी तो फार काळ टिकू शकला नाही. डॉज डिझायनरला प्रतिसादात देताना, मस्कने लिहिले की, तो X लोगोला पूर्वीप्रमाणे बदलत आहोत आणि Twitter च्या X लोगो काळानुसार आणखी विकसित होत राहील.

हेही वाचा : Cyber Crime : रॅनसमवेअर ‘अकीरा’ व्हायरसची सगळीकडे दहशत; CERT-In ने दिल्या सतर्क राहण्याच्या सूचना; वाचा काय आहे प्रकरण ….

हेही वाचा – Twitter Logo : एलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो का बदलला? वाचा, काय आहे कारण?

बदल आवडला नाही म्हणून मागे घेतला निर्णय

“मला त्या जाड रेषा आवडल्या नाहीत, म्हणून पुन्हा लोगो बदलण्याचा निर्णय मागे घेत आहे. लोगो कालांतराने विकसित होईल,” त्याने लिहिले.

ट्विटरच्या रीब्रँडिंगला युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काहीजण X आणि ते नव्या फिचर्ससाठी उत्साहित आहेत, तर काहीजण असे म्हणत आहेत की त्यांना ब्लू बर्ड लोगोचा निरोप घ्यायचा नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk modifies x logo but reverses his decision says new twitter logo will evolve over time snk
Show comments