एलॉन मस्क हे टेस्लाचे सीईओ आणि सर्वेसर्वा म्हणून प्रसिद्ध आणि लोकप्रियही आहेत. एलॉन मस्क आणि टेस्ला असे समीकरणच झाले आहे. मात्र अनेकांना हे ठावूक नाही की, ते टेस्ला कंपनीचे संस्थापक नाहीत. मार्टिन एबरहार्ड आणि मार्क टार्पेनिंग यांनी २००३ मध्ये टेस्ला कंपनीची स्थापना केली होती.
टेस्ला मोटर्स ही एक अमेरिकन इलेक्ट्रिक उत्पादन कंपनी आहे. जी ऑटोमोबाईल उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे नाव हे भौतिकशास्त्रज्ञ आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअर निकोला टेस्ला यांच्या नावावरून देण्यात आले आहे. १८८८ मध्ये निकोला टेस्ला यांनी एसी इंडक्शन मोटर टेक्नॉलॉजीचे पेटंट घेतले होते.
हेही वाचा : तुमच्या SIM ला eSIM मध्ये कन्व्हर्ट करणे योग्य आहे का? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे
एलॉन मस्क यांनी एकदा एका ट्विटला उत्तर देताना म्हंटलं होते की टेस्ला ही एक शेल कार्पोरेशन कंपनी होती. ज्यामध्ये कोणतेही कर्मचारी नव्हते. आयपी , डिझाईन नव्हते. म्हणजेच अक्षरशः या कार्पोरेशनमध्ये काहीच नव्हते. मात्र AC प्रोपल्शनच्या टी-झिरो कारचे व्यावसायिकरण करण्याची योजना होती जी एबरहार्डने नव्हे तर जेबी स्ट्रॉबेलने सादर केली होती. तसेच टेस्ला मोटर्स हे नावसुद्धा इतरांच्या मालकीचे होते.
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचे व्यावसायिकीकरण करणे आणि लोकांना हरित मार्गाकडे नेणे हा कंपनीचा यामागच्या उद्देश होता. हे लोटस एलिसच्या बॉडी शेलपासून तयार करण्यात आले होते. तेव्हा टेस्लाचे आपली पहिली पूर्णतः इन हाऊस डेव्हलप केलेली इलेक्ट्रिक कार मॉडेल -एस लॉन्च केली. २०१२ मध्ये खूपच स्वस्त किंमतीमध्ये हे मॉडेल लॉन्च करण्यात आले होते.