एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी Twitter ची खरेदी केली आहे. त्यानंतर त्यांनी कंपनीत अनेक बदल केले आहेत. नुकतेच त्यांनी अनेक वर्ष लोगो म्हणून असणाऱ्या निळ्या चिमणीला काढून नवीन लोगो जाहीर केला. आता ट्विटरचा नवीन लोगो X हा करण्यात आला आहे . मात्र मस्क हे सध्या आपल्या कंपनीमध्ये रीब्रँड करताना दिसून येत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे पहिल्यांदा कंपनीचा लोगो बदलला आणि आता त्यांनी व्यवस्थापनासाठी सोशल मीडिया डॅशबोर्ड अॅप्लिकेशन TweetDeck ला देखील रीब्रँड केले आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटडेकला रीब्रँड केले आहे. ट्विटडेक आता ‘XPro’ या नावाने ओळखले जाईल. आता जेव्हा तुम्ही ट्विटडेक या वेबसाईटला भेट देता आणि ज्यावेळेस लॉग आऊट कराल तेव्हा तुम्हाला पेजच्या वरील बाजूस ‘XPro’ लिहिलेले दिसेल. मात्र असे असले तरी देखील वेबसाईटची URL अजूनही “https://tweetdeck.twitter.com/” अशीच आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.
“XPro हे सोप्या इंटरफेसमध्ये अनेक टाइमलाइन कॉलम पाहण्याचा एक सोयीस्कर मार्ग आहे.” कंपनीने पेजवर नमूद केले. गेल्या महिन्यात प्लॅटफॉर्मने ट्विटडेकचे सुधारित व्हर्जन लॉन्च केले आणि म्हटले, ”३० दिवसांत वापरकर्त्यांना ट्विटडेकमध्ये प्रवेश करण्यासाठी अॅक्सेस व्हेरिफाइड करणे आवश्यक आहे.” दरम्यान, मंगळवारी कंपनीने कम्युनिटी नोट्ससाठी ‘ग्रुप मॉडेल्स’ नावाच्या स्कोअरिंग मॉडेल्सचा एक नवीन सेट लॉन्च केला. जे उपयुक्त नोट्स ओळखतात.
दुसऱ्या बाजूला असे दिसत आहे की,कंपनी अद्याप आयडी बेस व्हेरीफिकेशनवर काम करत आहे. अॅप संशोधक निमा ओवजी यांनी मंगळवारी एक स्क्रीनशॉट शेअर केला ज्यामध्ये असे दिसून आले की, कोणी वापरकर्त्याच्या ब्लू चेकमार्कवर क्लिक करते तेव्हा ”हे अकाउंट आयडी व्हेरिफाइड आहे” असे लिहिलेले एन नवीन लेबल दिसून येईल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मोठ्या पातळीवरील रीब्रँडिंगचा एक भाग म्हणून, मस्क यांनी ब्लू बर्ड लोगो बदलून तो X मध्ये बदलला. मस्कने सांगितले होते की, जर चांगला लोगो सापडला तर तो दुसऱ्या दिवशी लाइव्ह होईल. आपल्या शब्दांवर ठाम राहात त्यांनी सोमवारपर्यंत Twitter चा आयकॉनिक ब्लू बर्ड लोगो बदलला आणि Twitter च्या अधिकृत हँडलचे नाव देखील X असे केले गेले. वेब ब्राउझरवर साइट उघडताना दिसणारे Twitterचे ब्लू बर्ड लोगोची जागा देखील आता नवीन लोगोने घेतली आहे.
पण आता असे दिसते की, नवीन ट्विटर लोगोबाबत मस्क अजूनही गोंधळलेला आहे. नुकतेच त्यांनी नव्या X लोगोला वेगळ्या रूपात बदलले होते परंतु नवीन लोगोच्या जाड रेषा त्याला आवडल्या नाही म्हणून त्यांनी केलेला बदल परत मागे घेतला.