एलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडण्याची घोषणा केली असून त्यांनी या पदासाठी एका महिलेची निवड केली आहे. मस्क यांनी अद्याप नव्या सीईओचं नाव घोषित केलं नसलं तरी नवीन सीईओ येत्या सहा आठवड्यांत पदभार स्वीकारतील, अशी माहिती मस्क यांनी ट्वीटद्वारे दिली.
हेही वाचा – व्हॉट्सॲपवर तुम्हालाही येताहेत का आंतरराष्ट्रीय क्रमाकांवरून मिसकॉल? कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
ते म्हणाले, ट्विटरसाठी नव्या सीईओंची निवड केल्याचं जाहीर करताना मला आनंद होत आहे. ट्वीटरचे नवीन सीईओ येत्या सहा आठवड्यांत पदभार स्वीकारतील. राजीनामा दिल्यानंतर मी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी तसेच सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमचं काम पाहीन”
एलॉन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये ट्विटर विकत घेतलं, तेव्हापासून ते त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ट्विटरला कायमस्वरूपी सीईओ नाही. नवे सीईओ आल्यानंतर माझी भूमिका बदलेल. मला कोणत्याही कंपनीचे सीईओ व्हायचं नाही, असं त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं.
हेही वाचा – आता भारतामध्ये Google ‘Bard AI’ चा वापर करता येणार; मोफत वापरण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
दरम्यान, मस्क यांनी यासंदर्भात १९ डिसेंबर रोजी ट्विटरवर पोल सुरू केला होता. “मी ट्विटरच्या प्रमुखपदावरून पायउतार व्हायला हवं का? या पोलचा येणारा निकाल मला मान्य असेल, मी तो पाळेन”, असं एलॉन मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. त्यावेळी तब्बल ५७.५ टक्के युजर्सनं पदावरून पायउतार होण्याच्या बाजूने मत दिलं होतं.