जगभरात एआयचा वापर आणि त्यावरील संशोधन झपाट्याने होऊ लागले आहे. एआयमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जणू काही नवी क्रांती येत आहे. एआय जसे जसे विकसित होत जाईल, तसा त्याचा प्रभाव आणि परिणाम इतर क्षेत्रावरही जाणवू लागेल. जगभरातील अनेक मान्यवर मंडळी एआयबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. खुद्द एआयचे जनक डॉ. जेफ्री हिंटन यांनी तर एआयमुळे मानवी अस्तित्त्वालाच धोका असल्याचे म्हटले होते. त्यात आता स्पेसएक्स आणि टेस्ला यासारख्या आघाडीच्या कंपनीचा प्रमुख असलेल्या एलॉन मस्क यांनीही एआयबद्दल भाकीत वर्तविले आहे. एआयमध्ये झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे आगामी काळात आपल्या नोकऱ्या राहणार नाहीत, असे मस्क यांनी म्हटले. VivaTech 2024 या परिषदेत बोलताना एलॉन मस्क यांनी एआय आणि सोशल मीडियाचा वापर यावर भाष्य केले.

एलॉन मस्क म्हणाले की, आगामी काळात लोकांना छंद म्हणून नोकरी करावी लागेल. कारण एआय रोबोट्स सर्व क्षेत्र व्यापून टाकतील. अनेक प्रकारच्या सेवा प्रदान करण्याचे काम एआयकडून होईल. “तुम्हाला छंद म्हणून नोकरी करायची असेल तर तुम्ही करू शकाल. कारण तोपर्यंत एआय रोबोट्स हवे असलेले प्रत्येक काम करून देण्यास सक्षम झालेले असेल.

Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
Who will understand the pain of parents
“आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार” चिमुकल्याने सांगितले आई बाबांना वेळ देण्याचे दोन फायदे, VIDEO होतोय व्हायरल

‘एआयकडून मानवी अस्तित्वाला धोका’, ‘AI’चे जनक डॉ. जेफ्री हिंटन का व्यक्त केली चिंता?

एआयबद्दल बोलताना मस्क म्हणाले, “सत्य जाणून घेणे आणि आपल्या कुतुहलाचे उत्तर शोधण्यासाठी नक्कीच एआय मदत करू शकते. एआयचा मानवतेला फायदा आहेच.” याआधी ७ मे रोजी लॉस एंजिलिस येथे झालेल्या एका जागतिक परिषदेतही मस्क यांनी हीच भूमिका मांडली होती. सत्य शोधण्यापेक्षा एआयचा वापर राजकीय हेतूने केला जाऊ शकतो, त्याबद्दल मात्र मस्क यांनी चिंता व्यक्त केली. एआय अधिक पारदर्शक आणि प्रामाणिक असण्यासाठी या तंत्रज्ञानाला प्रशिक्षणाची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.

लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर अंकुश

अब्जाधीश असलेल्या एलॉन मस्क यांनी एआयमुळे सोशल मीडिया वापरणाऱ्यांच्या वर्तनात बदल होऊ शकतात, असेही सांगितले. “लहान मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्याची वेळ आली आहे. सोशल मीडिया कंपन्यात तीव्र स्पर्धा आहे, त्यामुळे युजर्सना अधिकाधिक खिळवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या स्क्रिन टाइमसडे लक्ष देण्याची गरज आहे. मुलांनी बाहेर जाऊन मैदानी खेळाकडे लक्ष द्यावे, पुस्तके वाचावीत. सोशल मीडियावमुळे आपल्या मुलांच्या जीवनावर वाईट परिणाम होत आहेत”, अशी खंत मस्क यांनी व्यक्त केली.

माझ्या मुलांना १८ वर्षांपर्यंत सोशल मीडिया बंदी

एलॉन मस्क पुढे म्हणाले, “माझ्या मुलांना १८ वर्षांचे होईपर्यंत सोशल मीडियापासून दूर राहण्यास सांगितले आहे. त्यांच्याकडे फक्त फ्लिप फोन (बटण असलेले) दिले आहेत. त्यांना जर त्यांच्या मित्रांशी गप्पा मारायच्या आहेत, तर त्यांनी सरळ चालत जाऊन मित्रांचे घर गाठावे. आपणही ८०-९० च्या दशकात हेच करत होतो. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ते काय करतात? कोणत्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वेळ घालवतात? याची माहिती पालकांनी ठेवावी.”