अब्जाधीश एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी Twitter ची खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी कंपनीत अनेक बदल केले. पेड सबस्क्रिप्शन असेल, ले ऑफ असेल किंवा सीईओची नेमणूक असेल. एलॉन मस्क यांनी सोमवारी म्हणजे आज ‘X’ या नवीन लोगोसह सुशोभित करण्यात आलेल्या आपल्या मुख्यालयाचा फोटो पोस्ट केला. सोशल मीडिया कंपनी लवकरच आपला लोगो बदलणार असल्याची घोषणा त्यांनी ट्विटमध्ये केल्यानंतर लगेचच याचे अनावरण करण्यात आले.

नवीन लोगोसह ट्विटर मुख्यालयाचा फोटो सीईओ लिंडा याकारिनो यांनी पोस्ट केला. ज्यांनी एक महिन्यापूर्वीच कंपनीच्या सीईओ पदाचा पदभार स्वीकारला आहे. एलॉन मस्क यांनी आपल्या प्रोफाईलवरील डिस्प्ले पिक्चर देखील बदलले आहे. यात मस्क यांनी X लोगो ठेवला आहे. हा फोटो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने “X लाइव्ह आहे” अशी घोषणा करण्याची पद्धत होती. याबाबतचे वृत्त ndtv ने दिले आहे.

zakir hussain account first post after demise
झाकीर हुसैन यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कुटुंबियांकडून पोस्ट; ‘तो’ खास फोटो शेअर करत लिहिलं…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Should you use hashtags on X Elon Musk
‘X’ वर हॅशटॅग वापरावे का? एलॉन मस्कने दिले उत्तर
Who Called R Ashwin After Retirement Cricketer Shares Call Log Picture
R Ashwin: “मला हार्टअटॅक आला असता…”, अश्विनला निवृत्तीच्या दिवशी कोणी केला कॉल? पोस्टमध्ये स्क्रिनशॉट शेअर करत म्हणाला
kareena kapoor shahid kapoor photos
करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”
Mitchell Santner appointed as New Zealand new white ball captain Replaces Kane Williamson
New Zealand New Captain: न्यूझीलंड संघाला मिळाला केन विल्यमसनचा उत्तराधिकारी, वनडे आणि टी-२० साठी नव्या कर्णधाराची घोषणा
Tanaji Sawant Changed his Facebook DP and Cover Page
Tanaji Sawant : तानाजी सावंत यांनी फेसबुकचा डीपी आणि कव्हर फोटो बदलला, शिवसेना नाव आणि चिन्हही हटवलं
Elon Musk kicked from Path of Exile 2 Game
Elon Musk ला गेममधून काढलं बाहेर? स्क्रीनशॉट शेअर करत सांगितलं कारण, वाचा नेमकं काय घडलं

हेही वाचा : लवकरच Twitter ची चिमणी जाणार? एलॉन मस्क यांचे सूचक ट्वीट; म्हणाले…

एका वापरकर्त्याने कमेंट केली, “तो खरं तर गंभीर होता. आता मला लक्षात आले की श्रीमंत लोकं नवीन कंपनी सुरू करण्याऐवजी आधीपासूनच स्थापित असलेल्या कंपन्या का विकत घेतात.”

”अभिनंदन एलॉन. मला पक्ष्याची आठवण येईल. मात्र मला वाटते की तुम्ही बऱ्याच कालावधीपासून तयार करू इच्छित असलेल्या गोष्टीकडे हे एक मोठे पाऊल आहे. आशा आहे की, सर्व तुकडे योग्य जागी पडतील आणि असेच होईल जशी तुम्ही कल्पना करत आहात.” असे एका वापरकर्त्याने लिहिले.

मस्क यांनी केले होते लोगो बदलण्यासंदर्भात ट्वीट

ट्विटरला X अ‍ॅपमध्ये रीब्रँड केले जात असल्याच्या बातम्या इंटरनेटवर येत आहेत. तथापि हा बदल लवकर होईल असा अंदाज कोणालाही नव्हता. मस्क हे ट्विटरला X अ‍ॅपच्या रूपात लोकांच्या अंदाजापेक्षाही लवकरच रीब्रँड करणार आहेत.

आपल्या योजनेबद्दल आणखी कोणतीही माहिती न देता तसेच टाइमलाइन स्पष्ट न करता मस्क यांनी ट्वीट केले होते. यामध्ये त्यांनी म्हटले, ”आणि आम्ही लवकरच ट्विटर ब्रँड आणि हळू हळू सर्व पक्ष्यांना निरोप देऊ.”

Story img Loader