Twitter एक मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. याचे सीईओ Elon Musk आहेत. एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया वेबसाईट ट्विटरवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. अब्जाधीश एलॉन मस्क हे जगातील निवडक राजकारण्यांना फॉलो करतात. उल्लेखनीय बाबा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर ८७ दशलक्षापेक्षा जास्त वापरकर्ते फॉलो करतात. नरेंद्र मोदी हे वापरकर्त्यांद्वारे जगातील सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्या राजकारण्यांपैकी एक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एलॉन मस्क यांच्या ट्विटर अकाऊंटवर होणाऱ्या हालचालींचा मागोवा घेणाऱ्या Elon Alerts या ट्विटर अकाऊंटने सर्वप्रथम ही माहिती शेअर केली. एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदी यांना फॉलो केल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : मुंबईतील Apple रिटेल स्टोअरजवळ ‘या’ २२ दिग्गज ब्रँड्सना आपली दुकाने उघडता येणार नाहीत, जाणून घ्या कारण

ट्विटर वापरकर्ते म्हणाले, एलॉन मस्क हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो करत आहेत म्हणजेच टेस्ला कारची लवकरच भारतात एंट्री होणार आहे.

निवडक लोकांनाच फॉलो करतात एलॉन मस्क

एलॉन मस्क हे जगातील १७५ ट्विटर अकाउंट्सला फॉलो करतात. यामध्ये ट्विटर आणि अन्य कंपनीच्या अकाउंट्सचा समावेश आहे. याशिवाय अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (@BaracObama),ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक(@RishiSunak) आणि मायक्रोसॉफ्टचे चेअरमन सत्या नडेला अशा अनेक प्रसिद्ध लोकांना मस्क फॉलो करतात.

हेही वाचा : Vivo T2 5G Series : विवो आज लॉन्च करणार ‘हे’ दोन जबरदस्त ५जी स्मार्टफोन, ‘या’ ठिकाणी पाहता येणार लाईव्ह स्ट्रीमिंग

एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींना ट्विटरवर फॉलो केल्यावर टेस्ला भारतात लवकरच प्रवेश करणार अशा शक्यता बांधल्या जात आहेत. एकूण १३४ दशलक्ष लोकं एलॉन मस्क यांना ट्विटरवर फॉलो करतात.