एलॉन मस्कनं ट्विटरची मालकी स्वीकारल्यानंतर कंपनीत वेगवेगळे बदल केले जात आहेत. ब्लू, यलो आणि ग्रे व्हेरिफिकेशन टिक मार्क तसंच स्वेअर प्रोफाइल फोटोनंतर कंपनीनं आता नवं फिचर आणणार असल्याची माहिती दिली आहे. नव्या फिचर अंतर्गत जर तुम्हाला एखाद्याचे ट्विट आवडले तर तुम्हाला ते सेव्ह करता येणार आहे. हे फीचर लवकरच येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
मस्कने ट्विट करत सांगितले की, आता वापरकर्ते त्यांचे आवडते ट्विट बुकमार्क म्हणून सेव्ह करू शकतील. विशेष म्हणजे, जेव्हा तुम्ही एखाद्याचे ट्विट सेव्ह कराल तेव्हा ते पूर्णपणे खाजगी राहील. म्हणजेच तुम्ही कोणते ट्विट बुकमार्क केले आहे हे इतर कोणीही पाहू शकणार नाही. पण तुम्ही जे ट्विट बुकमार्क म्हणून सेव्ह कराल, ज्या व्यक्तीने ते ट्विट केले आहे, त्याचे ट्विट किती लोकांनी सेव्ह केले आहे, हे त्याला बघता येईल.
(हे ही वाचा : 9 OTT ॲप्सचे सब्सक्रिप्शन मिळवा फक्त ‘इतक्या’ रुपयात, आता घ्या अनलिमिटेड चित्रपट-सीरिजचा आनंद, पाहा डिटेल्स )
ट्विटरवर एकामागून एक अनेक नवीन फीचर्स येत आहेत. मस्क यांनी एका ट्विटद्वारे सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर लवकरच भाषांतर फीचर येणार आहे, त्यानंतर लोक इतर देशांचे ट्विट त्यांच्या भाषेत वाचू शकतील.