एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरचे नाव बदलून एक्स असे केले आहे. म्हणजेच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ‘एक्स’ या नावाने ओळखले जाते. मस्क आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक नवनवीन फीचर्स किंवा अपडेट्स आणि अन्य गोष्टी लॉन्च करत असतात. एलॉन मस्क यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्यांसाठी दोन नवीन प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन लॉन्च केले आहेत. मस्क यांनी एक जाहिराती दिसणारा बेसिक प्लॅन व जाहिराती न दुसरा एक प्रीमियम प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅन्सची किंमत व त्या दोन प्लॅन्समध्ये वापरकर्त्यांना काय फायदे मिळणार आहेत , त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

एलॉन मस्क यांनी प्रीमियम + आणि एक बेसिक असे दोन सबस्क्रिप्शन प्लॅन लॉन्च केले आहेत. त्यातील बेसिक प्लॅनची किंमत $३ (प्रति महिना) म्हणजे २४३.७ रुपये असणार आहे. हा प्लॅन खरेदी केल्यास वापरकर्त्यांना जाहिराती दिसणार आहेत. या प्लॅनमध्ये निळ्या चेकमार्कचा (Blue Checkmark) समावेश नसणार आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना असत एडिट करण्यासाठी आणि मोठा मजकूर आणि व्हिडीओ पोस्ट करण्याच्या सुविधा देखील मिळणार आहेत. एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की , लॉन्च करण्यात आलेले दोन्ही प्लॅन्स सध्या वेब वरच खरेदी करता येणार आहेत.

Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
elon musk internet on mars
एलॉन मस्क मंगळावर पोहोचवणार इंटरनेट सेवा? कारण काय? त्याचा फायदा कोणाला?
A viral video of a young woman selling pani puri
“१५ -२० सेकंदांची रील आमचे कष्ट दाखवत नाही” पाणी पुरी विकणाऱ्या तरुणीने मांडली व्यथा, VIDEO होतोय व्हायरल
pravin tarde shares special post on the occasion of wife snehal tarde
“स्वतःचं घरदार आणि संसार सांभाळून…”, प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहलसाठी खास पोस्ट! मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या भावना
Boyfriend surprises his blind girlfriend with a braille proposal video
याला म्हणतात खरं प्रेम! अंध गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं केलं अनोखं प्रपोज; VIDEO पाहून तरुणाचं कराल कौतुक
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा

हेही वाचा : एक्स वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! एलॉन मस्क लवकरच लॉन्च करणार ‘हे’ दोन नवीन प्लॅन्स, जाणून घ्या

एलॉन मस्क यांनी एक्सवर पोस्ट केले, ”आम्ही ३ अमेरिकी डॉलर प्रति महिना (वेबच्या माध्यमातून जॉईन केल्यानंतर) साठी एक नवीन बेसिक टिअर पण लॉन्च करत आहोत जे तुम्हाला , सर्वात महत्वाच्या प्रीमियम सुविधा देणार आहोत.”

तसेच एलॉन मस्क यांनी $१६ (प्रति महिना) १,३०० रुपयांचा प्रीमियम प्लस प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनची खरेदी केल्यास वापरकर्त्यांना जाहिराती अजिबात दिसणार नाही आहेत. एलॉन मस्क यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये एक्स (पूर्वीचे ट्विटर) ची ४४ बिलियन मध्ये खरेदी केले आहे. तेव्हापासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मोठ्या प्रमाणात महसूल मिळवण्यासाठी मस्क वेगवगेळे प्रयत्न करताना दिसत आहेत.