सुरुवातीला एक्स (ट्विटर) हे फक्त एक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म होते, ज्यात तुमची मतं, विचार मांडण्यासाठी काही पोस्ट शेअर केल्या जात होत्या. पण, जेव्हापासून २०२२ मध्ये टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी एक्स (ट्विटर) खरेदी केलं आहे, तेव्हापासून एक्स (ट्विटर) मध्ये विविध बदल झाले आहेत. यामध्ये एक्स ॲपचा (ट्विटरचा) लोगो तर त्यांनी बदलला, पण या बरोबरच व्हिडीओ आणि कॉलिंग तर ऑनलाइन पेमेंटची सुविधा देण्याचेही युजर्सना वचन देण्यात आले आहे. तर आता एलॉन मस्क (Elon Mask) हे मास्टर प्लॅनच्या तयारीत आहेत. एलॉन मस्क युट्यूब आणि नेटफ्लिक्स, ओटीटी प्लॅटफॉर्मबरोबर स्पर्धा करण्यासाठी काही तरी खास घेऊन येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आता एलॉन मस्क नवीन व्हिडीओ टीव्ही ॲप सुरू करण्याच्या तयारीत आहेत. स्मार्ट टीव्हीवर व्हिडीओ पाहण्यासाठी एक नवीन सेवा उपलब्ध करून देणार आहेत. युजर्सना एक्स (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर नवीन सेवा उपलब्ध होईल. म्हणजेच एक्सवर दिसणारे मोठे व्हिडीओ युजर्स स्मार्ट टीव्हीवर पाहू शकणार आहेत; अगदीच युट्यूब आणि नेटफ्लिक्स व ओटीटी प्लॅटफॉर्मप्रमाणेच.

@DogeDesigner नावाच्या एका एक्स युजरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘तुम्ही लवकरच आपल्या आवडत्या X लॉंग फॉर्म व्हिडीओला थेट आपल्या स्मार्ट टीव्हीमध्ये पाहू शकाल.’ ही पोस्ट रिपोस्ट करत एलॉन मस्क यांनी ‘कमिंग सून’ असं लिहिलं आहे.

हेही वाचा…Vivo च्या ‘या’ दोन जबरदस्त स्मार्टफोनची मार्केटमध्ये एंट्री; फीचर्स अन् ऑफर्स एकदा पाहाच…

Fortune यांच्या अहवालानुसार एलॉन मस्क यांचे नवीन ॲप युट्यूब ‘टीव्ही ॲप’सारखे असेल. हे टीव्ही ॲप प्रथम सॅमसंग आणि ॲमेझॉन स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध होतील. सर्व युजर्स तसेच कन्टेन्ट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, चित्रपटप्रेमी, यांच्यासाठी हा ॲप खास ठरेल; कारण हा ॲप युजर्सना मोठ्या डिस्प्लेवर व्हिडीओ पाहण्यासाठी एक वेगळा अनुभव देतील, असे एलॉन मस्क यांनी सांगितले आहे. यामुळे आता युजर्सना एक नवीन टीव्ही ॲपसुद्धा मिळणार आहे.

तसेच एका पोस्टमध्ये एलॉन मस्कने शेअर केले की, एक्सच्या अल्गोरिदममध्ये बदल होणार आहे. युजर्स तुम्ही पिन केलेल्या पोस्ट फक्त ४८ तास पाहू शकाल. तसेच काही दिवसांनी इतर युजर्सना तुमच्या अकाउंटमधील फक्त एक पोस्ट दिसेल. त्यामुळे बाकी पोस्ट पाहण्यासाठी तुम्हाला त्यांना फॉलो करावं लागेल. त्यामुळे हे अपडेट तुमच्या अकाउंटचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल; तर लवकरच इतर व्हिडीओ ॲपला टक्कर देण्यासाठी एलॉन मास्क नवीन टीव्ही व्हिडीओ ॲप घेऊन येत आहेत.