Elon musk warn over fake account : ट्विटरवरील बनावट खाते बनवणाऱ्यांना एलन मस्क यांनी मोठा इशारा दिला आहे. बनावट खात्यांना तात्पुरते नाही तर कायमचे निलंबित केले जाईल, असा इशारा मस्क यांनी ट्विटरवर पोस्ट करून दिला आहे. ट्विटरची धुरा सांभाळल्यानंतर मस्क एकापाठोपाठ एक निर्णय घेत आहेत. अलिकडेच त्यांनी जवळपास ५० टक्के ट्विटर कर्मचऱ्यांना नोकरीवरून काढले. आता बनावट ख्यात्यांविरोधात त्यांची मोहीम सुरू झाली आहे.

पूर्वी खाते निलंबित करण्यापूर्वी आम्ही युजरला इशारा देत होतो. मात्र, आता मोठ्या प्रमाणात सत्यापनाचे काम सुरू आहे. त्यामुळे, आता खाते बंद करण्यापूर्वी युजरला कोणत्याही प्रकारचा इशारा दिला जाणार नाही, असे मस्क यांनी ट्विटरवरून सांगितले. तसेच, ट्विटर ब्ल्यू मिळण्यासाठी ही अट म्हणून बघितल्या जाईल. इतकेच नव्हे तर, ब्ल्यू टीक असलेल्या युजरने आपल्या खात्याचे नाव बदलले तर टीक तात्पुर्ते हटवल्या जाईल, असा इशाराही मस्क यांनी दिला.

(डेटा चोरतात ‘हे’ ४ अ‍ॅप्स; फोनमधून लवकर अनइन्स्टॉल करा, अन्यथा होईल नुकसान)

या देशांमध्ये सुरू झाली ‘ट्विटर ब्ल्यू’ सेवा

ट्विटरने ब्ल्यू टीकसाठी पैसे घेण्याची सेवा आयओएससाठी सुरू केली आहे. सत्यापनासह ट्विटर ब्ल्यू सेवा सध्या, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड किंगडमध्ये आयओएसवर उपलब्ध आहे. २००९ मध्ये ट्विटर ब्ल्यू टीकची सुरुवात झाली होती. मोठ्या सेलिब्रिटींच्या खात्यांची पडताळणी करण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली होती.

भारतात कधी सुरू होणार?

प्रभू नावाच्या युजरने ट्विटरवर मस्क यांना भारतात ट्विटर ब्ल्यू सेवा कधी सुरू होणार, असा प्रश्न केला होता, त्यावर एका महिन्यापेक्षाही कमी कालावधीत, असे उत्तर मस्क यांनी दिले. म्हणजे याच महिन्यात ही पेड सेवा भारतात सुरू होण्याची शक्यता आहे.

ट्विटरसाठी ४४ कोटींचा करार

टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर्सला ट्विटरची खरेदी केली. त्यानंतर मस्क यांनी अनेक निर्णय घेतले. त्यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह काही उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर मस्क काय करतीय या विषयी अनेकांच्या मनात भिती होती. नोकर कपातीबाबत अफवा होत्या. मात्र त्या खऱ्या ठरल्या. मस्क यांनी जवळपास ५० टक्के ट्विटर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले.

(Samsung vs apple : पण त्यांच्याकडे असा फोन नाही.. सॅमसंगने जाहिरातीतून केले अ‍ॅपलला ट्रोल, पाहा हा व्हिडिओ)

म्हणून नोकरकपात केली

एलॉन मस्क यांनी या निर्णयासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवर त्यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे पाचच्या सुमारास ट्वीट करून याबाबत माहिती दिली. ट्विटरमधील कर्मचारी कपातीविषयी बोलायचे झाले, तर दुर्दैवाने आमच्यासमोर काही पर्यायच उरला नव्हता. कंपनीचे दिवसाला तब्बल ४ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होत होते, अशी माहिती मस्क यांनी दिली आहे.

Story img Loader