Elon Musk Top Search Zomato App : टेस्ला आणि सर्वाधिक श्रीमंती यामुळे इलॉन मस्क आधीच चर्चेत होते. मात्र ट्विटरचा ताबा मिळवल्यानंतर ज्या एकापाठोपाठ एक घडामोडी घडल्या त्यानंतर ते सतत चर्चेत आहेत. २०२२ वर्षातील सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी ते एक झाले आहेत. परंतु, ते केवळ गुगल सर्चवरच नव्हे, तर एका लोकप्रिय फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोवर ट्रेंडिगमध्ये आहेत. इलॉन मस्क यांचा आहार काय आणि कोणते अन्न पदार्थ या श्रीमंत व्यक्तीच्या मेंदूला चालना देण्यात मदत करत आहेत, हे जाणून घेण्यासाठी भारतीय उत्सुक आहेत.
नुकतेच पुढे आलेल्या झोमॅटोच्या वार्षिक अहवालात ‘इलॉन मस्क फूड’ हे अॅपमध्ये सर्वाधिक सर्च केलेल्यांपैकी एक आहे. इलॉन मस्क कोणते अन्न पदार्थ खातात हे जाणून घेण्यासाठी अॅपवर ७२४ सर्च करण्यात आले.
(एकाचवेळी ११ शहरांमध्ये लाँच झाली Jio True 5g सेवा, महाराष्ट्रातील ‘या’ २ शहरांचा समावेश)
ज्या लोकांना मस्क यांच्या आहाराबाबत जाणून घ्यायचे होते, त्यांना मस्क यांनी काही महिन्यांपूर्वीच आपल्या वेट लॉस प्रवासाबाबत सांगितले होते. आपण ९ किलो वजन कमी केले असून चविष्ट पदार्थांसह उपवास, ओझेम्पिक किंवा विगोवी हे त्यामागील रहस्य असल्याचे मस्क यांनी शेअर केले होते.
झोमॅटोवर इलॉन मस्क फूड शेअर केल्यावर फास्ट फूड, स्ट्रिट फूड आणि वेस्टर्न फूड असे परिणाम मिळतात. इलॉन मस्कसह विराट कोहली काय खातो? या विषयी देखील सर्च करण्यात आले. ‘ये कोहली क्या खाता है’ हे टॉप सर्चमध्ये होते. त्याचबरोबर, अनोख्या पदार्थांसाठीही अधिक वेळा सर्च करण्यात आले. ‘ओरिओ पकोडा ४ हजार ९८८ वेळा सर्च करण्यात आला.