Twitter ही एक मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. एलॉन मस्क हे ट्विटरचे सीईओ आहे. नुकतेच कंपनीने आपला लोगो बदलला आहे. निळी चिमणी काढून त्या ठिकाणी ‘X’ हा लोगो ठेवण्यात आला आहे. भारतातील ट्विटर वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जून आणि जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये एलॉन पूर्वीच्या ट्विटर आणि आताच्या ‘X’ कॉर्पने भारतातील २३,९५,४९५ अकाउंट्सवर बंदी घातली आहे. बाल लैंगिक शोषण आणि भावना उद्दीपित करणाऱ्या कंटेंटचा (porn) प्रसार केल्याबद्दल ही बंदी घालण्यात आल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच एक्स कॉर्पने देशातील दहशतवादाला प्रोत्साहन देण्याऱ्या १,७७२ अकाउंट्सवर बंदी घातली आहे. ट्विटरच्या मासिक रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. जो भारताच्या नवीन आयटी नियम २०२१ चा एक भाग आहे. वर दिलेल्या कालावधीमध्ये कंपनीला भारतातून एकूण ३,३४० वापरकर्त्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : Independence Day Sale: ६३ हजारांमध्ये होऊ शकता iPhone 14 Pro मॅक्सचे मालक, ‘या’ प्लॅटफॉर्मवरील ऑफर्स एकदा पाहाच

तसेच, २६ जून ते २५ जुलै २०२३ दरम्यान, X ने देशातील अतिरिक्त १८,५१,०२२ अकाउंट्सवर बंदी घातली. या कारवाईमध्ये २,८६५ अकाउंट देशांतर्गत प्लॅटफॉर्मवर दशतवादाला चालना देण्यात त्यांचा सहभाग असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली. या कालावधीमध्ये प्लॅटफॉर्मवर तक्रार निवारण भारतीय वापरकर्त्यांकडून २,०५६ तक्रारी प्राप्त झाल्या.

महत्वाचे म्हणजे, X ने २६ जून ते २५ जुलै दरम्यान अकाउंटवर बंदी घातल्यानंतर आलेल्या अपिलांमध्ये ४९ तक्रारी हाताळल्या. यापैकी, विशिष्ट परिस्थितीच्या पुनरावलोकनानंतर एक अकाउंटवरची बंदी रद्द करण्यात आली. भारतात प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी सर्वाधिक मध्ये बहुतांश तक्रारी या गैरवर्तन किंवा छळ(१,७८३), संवेदनशील अ‍ॅडल्ट कंटेंट(५४), द्वेषपूर्ण कंटेंट(४८) याच्याशी संबंधित होत्या.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk x corp 23 lakh accounts ban in india june july for child sexual exploitation violations tmb 01
Show comments