जगाच्या प्रत्येक भागात इंटरनेट उपलब्ध होत आहे. हजारो वर्षांपासून ॲमेझॉन जंगलातमध्ये राहणाऱ्या आदिवासींना इंटरनेट जगताशी जोडण्यासाठी इलॉन मस्कच्या कंपनी स्टारलिंकने येथे इंटरनेटची सेवा सुरू केली. २ हजार लोकसंख्या असलेली मारुबोज जमात या माध्यमातून प्रथमच इंटरनेट जगाशी जोडली गेली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ब्राझीलमध्ये इंटरनेट सेवा सुरू झाल्यामुळे ॲमेझॉनच्या जंगलात इंटरनेट सेवा पोहोचली. पण अवघ्या काही महिन्यात आदिवासी तरुण सोशल मीडिया आणि पॉर्नचे व्यसन लागले आहे त्यामुळे आदिवासियांना आता नव्या समस्येचा सामना करावा लागत आहे. इंटरनेट चुकीचा वापर केल्याने त्यांच्या संस्कृतीला धोका वाढला आहे.

मारुबो लोक इटुई नदीकाठी ॲमेझॉनच्या जंगलात राहतात. ते स्वतःची भाषा बोलतात आणि नदीकाठी विखुरलेल्या झोपड्यांमध्ये राहतात. ते स्पायडर माकडांना (स्पायडर मंकी) पाळीव प्राणी म्हणून ठेवण्यासाठी किंवा सूप बनवण्यासाठी पकडतात. शेकडो वर्षांपासून, ही जमात अलिप्त राहिली आहे आणि अशीच जीवनशैली जपली आहे. जमातीच्या इंटरनेटवर अचानक वापर करता येऊ लागल्यामुळे अनपेक्षित समस्या उद्भवल्या आहेत.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
A group of people looking at stock market data on a screen.
Hindenburg : हिंडनबर्ग रिसर्च बंदची घोषणा अन् अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये उसळी; BSE वर अदाणी पॉवर, ग्रीन एनर्जी तेजीत
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडीला दिली महत्त्वाची परवानगी!
Mahakumbh Mela 2025
Mahakumbh Mela 2025: स्वतंत्र भारताच्या पहिल्या महाकुंभाकडून काय शिकवण मिळाली? १९५४ च्या प्रयागराज महाकुंभाचा इतिहास काय सांगतो?
What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
AAP MLA Gurpreet Gogi
पंजाबमधील आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू, लुधियाना डीएमसी रुग्णालयात प्राणज्योत मालवली

हेही वाचा – खळखळ वाहणाऱ्या नदीत सिंहाने मारली उडी अन्…. मसाई मारा नॅशनल रिझर्व्हमधील थरारक Video Viral

WION च्या मते, जमातीचे खूप विशिष्ट नियम आणि रीतिरिवाज आहेत. पुराणमतवादी गट त्यांच्या सदस्यांना सार्वजनिकपणे चुंबन घेण्याची(किस करण्याची) परवानगी देत ​नाही. आता, पोर्नोग्राफिक आशयामुळे, या वंशाच्या जुन्या चालीरीतींवर परिणाम होईल अशी भीती वडीलधाऱ्यांना वाटत आहे.

न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना ७३ वर्षीय त्सेनामा मारुबो म्हणाले की, “जेव्हा ते आले तेव्हा सर्वांना आनंद झाला. इंटरनेट खूप उपयुक्त आहे. यामुळे आमचे जीवन सोपे झाले परंतु आता परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. इंटरनेटमुळे तरुणाई आळशी झाली आहे. ते गोरे लोकांचे शिष्टाचार शिकत आहेत. तरुणाई आता सतत फोनला चिकटून असते. मित्रांसह चॅट करत असतात. त्यांना अश्लील आशय पाहायला मिळत आहे, ज्यामुळे तरुणाईला चुकीची शिकवण दिली जात आहे.”

न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना मारुबो संघाचे नेते अल्फ्रेडो मारुबो यांनी इंटरनेटवर भरपूर टिका केली.”पोर्नोग्राफीला सर्वात जास्त त्रास होतो. तरुण त्यामुळे खूप प्रभावित झाले आहेत. लोकांवर त्याचा चूकीचा परिणाम होत आहे.”

हेही वाचा – ‘पंचायत’ वेबसिरीजमधील प्रसिद्ध फुलेरा गाव पाहिले का? Viral Video पाहून चाहते झाले खूश, म्हणाले, “रस्ता….

इंटरनेटमुळे आदिवासीयांना झाले अनेक फायदे

इलॉन मस्कच्या स्टारलिंकचे उद्दिष्ट जगभरात हाय-स्पीड इंटरनेट पुरवण्याचे आहे. सॅटेलाइट इंटरनेट मार्केटमधील हा खेळाडू पूर्वी अकल्पनीय दुर्गम भागात इंटरनेटचा वापर करत आहे. इंटरनेटच्या वापरासाठी हे एंटिना अमेरिकी उद्योजक एलिसन रेनेउद्वारे आदिवासी जमातीला दान करण्यात आले. इंटरनेटचे आगमन दुर्गम जमातीसाठी बरेच चांगले मानले गेले. उपचारांसह अनेक आपत्कालीन परिस्थितीत लोकांना त्वरित मदत पुरवण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरले. टोळीतील एका सदस्याने सांगितले की.”विषारी साप चावल्यास हेलिकॉप्टरने त्वरित बचाव करणे आवश्यक आहे. इंटरनेटच्या आधी, मारुबो लोक रेडिओ वापरत असे, अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक गावांमध्ये संदेश प्रसारित करत. इंटरनेटमुळे असे कॉल्स जलद करणे शक्य झाले आहे.”

Story img Loader