जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर कंपनीमध्ये अनेक फेरफार केले. जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याबरोबरच त्यांनी ब्ल्यू टीक या व्हेरिफिकेशन संदर्भातील सेवेवर शुल्क घेण्याचा निर्णय घेतला. अमेरिका, युकेसह काही देशांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली. मात्र, ब्ल्यू टीकचा गैरवापर होण्याची शंका व्यक्त करण्यात आली आणि नंतर बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याचेही काही अहवलांतून समोर आले. या पार्श्वभूमीवर आता इलॉन मस्क यांनी अनिश्चित काळासाठी ब्ल्यू टीक सब्सक्रिप्शन सेवेचे रिलाँच थांबवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इलॉन मस्क यांनी ट्विट करून ब्ल्यू टीक सब्सक्रिप्शनबाबत माहिती दिली आहे. बनावट खाती बंद करता येणार हे सुनिश्चित होईपर्यंत ट्विटर ब्ल्यू टीक सब्सक्रिप्शन सेवेचे रिलाँच थाबवण्यात आले आहे. व्यक्तींपेक्षा संस्थांसाठी भिन्न रंगांचे चेक वापरू, अशी माहिती मस्क यांनी दिली. इलॉन मस्क यांनी गेल्या आठवड्यात २९ नोव्हेंबरला ट्विटर ब्ल्यू टीक सेवा पुन्हा सुरू होणार, असे सांगितले होते, मात्र त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे, युजर्सना ब्ल्यू टीकसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

(अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी मेटाची तरतूद; संशयास्पद व्यक्तींपासून ‘अशी’ मिळणार सुरक्षा)

राजकीय नेते, लोकप्रिय व्यक्ती, पत्रकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी ट्विटर ब्ल्यू टीक सेवा सादर करण्यात आली होती. मात्र, ट्विटरचा महसूल वाढवण्यासाठी ब्ल्यू टीक सेवेला शुल्कासह सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले. मात्र, काही दिवसांतच बनावट खात्यांमुळे मस्क यांना ही सेवा थांबवावी लागली.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon must hold twitter blue tick subscription relaunch ssb