Enhance photo quality with ai websites: कॅमेरातून काढलेले फोटो अनेकवेळा चांगले निघत नाही. परंतु, फोटोची गुणवत्ता सुधारण्यासाठी इंटरनेटवर काही संकेतस्थळे उपलब्ध आहेत ज्यावर तुम्ही मोफत फोटोची गुणवत्ता सुधारू शकता. व्हिडिओ देखील एडिट करू शकता. कोणती आहे ही संकेतस्थळे? जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) आयएमजीलार्जर.कॉम

स्मार्टफोनद्वारे फोटो घेताना अनेकवेळा चांगल्या गुणवत्तेचे फोटो निघत नाही. अनेक लोक सुंदर छायाचित्रांसाठी स्नॅपचॅटचा देखील वापर करतात. याने फोटो ब्राइट होतात, मात्र त्याची गुणवत्ता कमी होते. अनेकवेळा असे फोटो एडिटिंगसाठी सॉफ्टवेअरवर अपलोडही होत नाहीत. अशात तुम्ही imglarger या संकेतस्थळाची मदत घेऊ शकतात. imglarger छायाचित्रांची क्वालिटी वाढवून छायाचित्र डाऊनलोडसाठी उपलब्ध करते.

(टॉप 5 Premium Smartphone ची यादी पाहिली का? वॉटर फ्रुफ, क्वालिटी कॅमेरासह दमदार फीचर्स, खरेदीपूर्वी टाका एक नजर)

२) फोटोमधून अनावश्यक गोष्टी वगळा

ग्रुप फोटो घेताना अनेकवेळा काही लोकांचा चांगला फोटो निघत नाही. फोटो क्रॉप केल्यास त्याच्या गुणवत्तेवर परिणाम पडतो, ती कमी होते. त्याचबरोबर फोटोच्या साइजवर देखील प्रभाव पडतो. तुम्ही फोटोतून एका व्यक्तीला हटवू इच्छित असाल तर त्यासाठी magiceraser.io हे संकेतस्थळ फायदेशीर ठरू शकते. या संकेतस्थळाद्वारे तुम्ही फोटोमधील अनावश्यक गोष्टी हटवू शकता.

३) व्हिडिओचे बॅकग्राउंड हटवा

unscreen.com या संकेतस्थळाद्वारे तुम्ही कोणत्याही व्हिडिओतील बॅकग्राउंड हटवू शकता. त्याचबरोबर, व्हिडिओ तुम्ही व्हिडिओची साइज देखील अ‍ॅडजेस्ट करू शकता. व्हिडिओ एडिटर्ससाठी हे संकेतस्थळ फायदेशीर ठरू शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enhance photo quality with these ai websites ssb
Show comments